यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, सृष्टी देशमुखचा देशात पाचवा क्रमांक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी […]

यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, सृष्टी देशमुखचा देशात पाचवा क्रमांक
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी

  1. सृष्टी देशमुख – पाचवी
  2. तृप्ती धोडमिसे – 16 वी
  3. वैभव गोंदणे – 25 वा
  4. मनिषा आव्हाळे – 33 वी
  5. हेमंत पाटील – 39 वा

टॉपर विद्यार्थ्यांची यादी

  1. कनिष्क कटारिया
  2. अक्षत जैन
  3. जुनैद अहमद
  4. श्रवण कुमात
  5. सृष्टी जयंत देशमुख
  6. शुभम गुप्ता
  7. कर्नाटी वरूणरेड्डी
  8. वैशाली सिंह
  9. गुंजन द्विवेदी
  10. तन्मय वशिष्ठ शर्मा

यूपीएससीकडून एकूण 759 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. देशात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडणारी ही सर्वोच्च परीक्षा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या निकालातही महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांचा समावेश होता.