आयुष्मानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’वर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये आपल्या निरनिराळ्या भूमिकांच्या जोरावर कमी वेळात यशाचं शिखर गाठलेल्या (Trump Reaction On Ayushmann Khurrana Movie) अभिनेता आयुष्मान खुरानाचा आणखी एक वेगळा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या निरनिराळ्या भूमिकांच्या जोरावर कमी वेळात यशाचं शिखर गाठलेल्या (Trump Reaction On Ayushmann Khurrana Movie) अभिनेता आयुष्मान खुरानाचा आणखी एक वेगळा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या शुक्रवारी (21 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. हा एक गे (समलिंगी) रोमान्स-कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाने फक्त प्रेक्षकांनाच नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही प्रभावित केलं आहे.

या सिनेमाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी मोहीम चालवणाऱ्या पीटर यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर या सिनेमाबाबत ट्विट केलं (Trump Reaction On Ayushmann Khurrana Movie), यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केलं आहे.

“बॉलिवूडचा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गे कपलला रोमान्स करताना दाखवण्यात आलं आहे. भारतात समलैंगिक संबंध वैध झाल्यानंतर हा सिनेमा वृद्ध लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी तयार आहे. वाह”, असं ट्विट पीटर यांनी केलं.

पीटर यांच्या या ट्विटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत ‘ग्रेट’ असं लिहिलं.

यानंतर पीटर यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला रिट्विट केलं. “राष्ट्राध्यक्षांकडून एलजीबीटीच्या मुद्याला गंभीरतेने घेण्याची ही सुरुवात आहे, त्यांचा कुठला पीआर स्टंट नाही, अशी मी आशा करतो”, असं ट्विट पीटर यांनी केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया या दोनदिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. ते 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतात असतील. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

Trump Reaction On Ayushmann Khurrana Movie

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI