औरंगाबादेत प्रियदर्शनी शाळेतून किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात, 100% उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन!

| Updated on: Jan 03, 2022 | 4:06 PM

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे मनपा प्रियदर्शनी केंद्रीय विद्यालय येथे किशोरवयीन मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

औरंगाबादेत प्रियदर्शनी शाळेतून किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात, 100% उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन!
प्रियदर्शनी शाळेत मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करताना औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई
Follow us on

औरंगाबादः राज्यात आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी शाळेतून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे मनपा प्रियदर्शनी केंद्रीय विद्यालय येथे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उप महापौर श्रीमती स्मिता घोगरे,मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय तसेच शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

शहरात 85% लसीकरण पूर्ण 100% कडे वाटचाल- प्रशासक

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना मा प्रशासक म्हणाले की ,आज घडीला महानगर पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि लसींची उपलब्धता आहे.नागरिकांनी आपल्या आरोग्य सुरक्षितते साठी आपले दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे.आज पर्यंत शहरातील नागरिकांचे 82 ते 85 % लसीकरण झाले आहे.लवकरच उर्वरित नागरिकांचे 100 %लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.यासाठी महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कमीत कमी काळात 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन टाळणे आपल्या हाती- सुभाष देसाई

पालकमंत्री श्री सुभाष देसाई 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेची सुरुवात प्रसंगी म्हणाले की, कोरोना विरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. याकरिता आपण सर्वांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी लसीकरणा सोबत कोविड नियमांचे पालन करणेसुद्धा गरजेचे आहे. त्यांनी आपल्या घरातील लसीकरण राहिलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यानी यावेळी केले. लॉकडाऊन टाळणे आपल्या हातात आहे. त्याकरिता सर्व नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक डोस

आज सुरुवातीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कोव्हिडची लस देण्यात आली. शाळेतील 40 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली .या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ मेघा जोगदंड, डॉ संगीता पाटील,डॉ प्रेमलता कराड ,डॉ बाळकृष्ण राठोडकर,डॉ प्रेरणा संकलेचा ,शिक्षक शशिकांत उबाळे,सुरेखा महाजन ,तेजस्विनी देसले, नर्सेस , कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

NCB | उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली