Corona Effect : पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, किमतींनी ओलांडली शंभरी

| Updated on: Mar 25, 2020 | 11:45 AM

शहरासह, उपनगरात फळ आणि पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण (Vegetables price hike due to corona) झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते भाज्या महाग विकत आहेत.

Corona Effect : पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, किमतींनी ओलांडली शंभरी
Follow us on

पुणे : शहरासह, उपनगरात फळ आणि पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण (Vegetables price hike due to corona) झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते भाज्या महाग विकत आहेत. सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले असून बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. पालेभाज्यांच्या गड्डीचे दर 50 ते 30 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील अडते आणि कामगार संघटनांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बाजार बंद ठेवला होता. त्यामुळे सोमवारी बाजारात अत्याअल्प आवक झाली होती. सतत चार दिवस भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दराने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता पुन्हा मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय अडते, चेंबर आणि इतर कामगार संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला मिळणार की नाही, या भीती पोटी मिळेल त्या किंमतीत ग्राहक भाजीपाला खरेदी करत आहे. मार्केट यार्ड बंद राहिले तर भाजीपाला, फळांचा आणि किराणा मालाचा तुटवडा निर्माण होणार आहे. याचाचा फायदा घेऊन किरकोळ विक्रेते वाटेल त्या भावात मनमानी पद्धतीने विक्री करत आहेत. प्रशासनाने यावर अंकुश आणण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला घाऊक बाजारात भाज्या मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व पेठा, शिवाजीनगर, कोथरुड, वारजे-माळवाडी, कोरेगावपार्क, कर्वेनगर, कात्रज, गोकुळ नगर, सुखसागर नगर, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर

भाज्या              दर

हिरवी मिरची      160

शेवगा               120

गवार                 1२0

वाटाणा              160

दोडका                80

कोबी                   80

कांदा                   80

बटाटा                 60

वांगी                   80

फ्लाॕवर               80

पालेभाज्यांच्या गड्डीचे दर

कोथिंबीर             50

मुळा                   40

मेथी                    30

कांदापात              30

अंबाडी                 30

चाकवत                30

संबंधित बातम्या :

विळखा वाढला, सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण

नवी मुंबईत मशिदीच्या मौलवीला कोरोना, तीन फिलिपिनी नागरिकांनाही संसर्ग