देशभरात फोटो व्हायरल होणारी ही महिला कोण?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

लखनौ (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर सध्या एका पिवळ्या साडीवरच्या महिलेचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. पण ही महिला कोण? हा प्रश्न लोकांना पडला आहे. तिचे फोटो व्हायरल का होत आहेत, असा प्रश्न लोकांना पडला आहे. या फोटोमधील ही महिला निवडणूक अधिकारी असल्याचे सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या महिलेचे जे फोटो शेअर होत आहेत […]

देशभरात फोटो व्हायरल होणारी ही महिला कोण?
Follow us on

लखनौ (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर सध्या एका पिवळ्या साडीवरच्या महिलेचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. पण ही महिला कोण? हा प्रश्न लोकांना पडला आहे. तिचे फोटो व्हायरल का होत आहेत, असा प्रश्न लोकांना पडला आहे. या फोटोमधील ही महिला निवडणूक अधिकारी असल्याचे सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर या महिलेचे जे फोटो शेअर होत आहेत त्यावरुन असं म्हटलं जात आहे की, ही महिला जयपूर येथील निवडणूक अधिकारी आहे. काही लोकांनी दावा केलाय की, या पिवळ्या साडीवरच्या महिलेमुळे मतदानाच्या टक्क्यांमध्येही वाढ झाली आहे.

या महिलेचे फोटो पाहून लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. त्यासोबतच मतदानाचा टक्का वाढल्यामुळे तिचे आभारही व्यक्त केले जात आहे. सुरुवातीला कळत नव्हते ही महिला कोण आहे, पण आता ते स्पष्ट झाले आहे.

ही पिवळ्या साडीवरील महिला लखनौमध्ये राहणारी रीना द्विवेदी आहे. रीना सार्वजनिक बांधकाम विभागात काम करते आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे जयपूरचे नसून लखनौमधील आहेत.

रीना काम करत असलेल्या मतदान केंद्रावर 70 टक्के झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही जण या मतदान केंद्रात 100 टक्के मतदान झाल्याचे सांगतात.

“फोटो अचानक व्हायरल झाल्यामुळे अनेकजण सेल्फी घेण्यासाठी विनंती करत असतात. तसेच मित्र-परिवारांकडून फोन येत आहेत. हे सर्व चांगलंही वाटत आहे पण नरवसही वाटत आहे”, असं रीना द्विवेदी म्हणाली.