धावत्या गाडीमागे कुत्रे का लागतात?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: पाळीव कुत्रे असो वा मोकाट कुत्रे, त्यांना एक सवय असते, ती सवय म्हणजे धावत्या गाड्यांमागे भुंकत पाठलाग करण्याची. ते असं का करतात? असा प्रश्न याआधी तुम्हाला नक्कीच पडला असेल. यामागची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कुत्रे नेहमीच कार आणि मोटारसायकलीवर लघुशंका करतात. त्याद्वारे ते एकप्रकारे त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्रही तयार करत असतात. अशावेळी एखाद्या कुत्र्याने गाडीवर लघुशंका […]

धावत्या गाडीमागे कुत्रे का लागतात?
Follow us on

मुंबई: पाळीव कुत्रे असो वा मोकाट कुत्रे, त्यांना एक सवय असते, ती सवय म्हणजे धावत्या गाड्यांमागे भुंकत पाठलाग करण्याची. ते असं का करतात? असा प्रश्न याआधी तुम्हाला नक्कीच पडला असेल. यामागची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  1. कुत्रे नेहमीच कार आणि मोटारसायकलीवर लघुशंका करतात. त्याद्वारे ते एकप्रकारे त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्रही तयार करत असतात. अशावेळी एखाद्या कुत्र्याने गाडीवर लघुशंका केली असेल आणि त्यानंतर ती गाडी दुसऱ्या भागात गेली, तर त्या दुसऱ्या भागातील कुत्रे त्या गाडीवर भुंकतात.  त्या गाडीवर केलेल्या लघुशंकेवरुन  कुत्रे त्या गाडीवर भुंकत असतात.
  1. एरव्ही कुत्रे गाड्यांऐवजी इतर प्राण्यांवरही धावून जातात. यावेळी त्यांचा शिकार करण्याचा उद्देश नसतो, तर ते खेळ खेळत असतात. अशावेळी समोरचा प्राणी किंवा संबंधित व्यक्ती पळाला की मग त्याची खैर नाही.
  2. कधी-कधी तर कुत्रे स्वत:च्या संरक्षणासाठीही इतरांवर धावून जातात. यावेळी कुत्र्यांपासून काळजी घ्यायला हवी. ते तुम्हाला जखमीदेखील करु शकतात.
  3. कुत्रे नेहमीच गाड्यांखाली झोपतात. अशावेळी जर तुम्ही ती गाडी तिथून काढली तर त्या गाडीमागे कुत्रे लांबपर्यंत धावत येतात. तेव्हा त्यांच्या मनात आपला निवारा हिसकावून घेऊन जात असल्याची भावना असते.
  4. मोठ्या प्रमाणात गाड्यांखाली कुत्रे मारली जातात. अशावेळी त्या कुटुंबातील कुत्रे त्याचा बदला घेण्यासाठी तशा प्रकारची गाडी दिसताच भुंकू लागतात.

 कुत्र्यांची वरील कारणे असली तरी कुत्र्यांच्या वर्तणुकीवर संशोधक अधिक संशोधन करत आहेत.