राज्यात थंडीचा कडाका, नागपुरात पारा 5 अंशावर

| Updated on: Dec 28, 2019 | 4:52 PM

राज्यात अनेक ठिकाणाचा पारा काही अंशाने घसरला आहे. डिसेंबर अखेरीला आणि नव्या वर्षापासून अनेकांना गुलाबी थंडींचा अनुभव घेता येणार  (winter in maharashtra) आहे.

राज्यात थंडीचा कडाका, नागपुरात पारा 5 अंशावर
Follow us on

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत (winter in maharashtra) होतं. मात्र शुक्रवारी पहाटेपासून राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा काही अंशाने घसरला आहे. डिसेंबर अखेरीला आणि नव्या वर्षापासून अनेकांना गुलाबी थंडींचा अनुभव घेता येईल (winter in maharashtra) असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तरी भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. येत्या 3 दिवसात अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सपाटीपेक्षा अधिक गारठा जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे आणि शेकोटीचा आसरा घेतला आहे. मात्र थंडी वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गारठा वाढल्याचा सर्वाधिक फायदा रब्बी हंगामातील पीक गहू आणि इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे दिसत आहे. सातपुड्यातील घसरलेला पारा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे पाहायला मिळत (winter in maharashtra) आहे.

मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल

गुरुवारी (26 डिसेंबर) रात्रीपासून मुंबईकरांना हळूहळू गारठ्याची जाणीव होऊ लागली आहे. मुंबईत शनिवारी 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर राज्यभरात किमान तापमानाचा पारा आणखी उतरला आहे. त्यामुळे दिवाळीपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्राला नाताळानंतर थंडीचा अनुभव मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नाशिकमध्ये थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

नाशिकमध्येही गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरात नागरिकांनी जागोजागी शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहे.

वाशिममध्ये अंगावर उबदार कपडे

वाशिम जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल होऊन तापमान 12 अंशावर गेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हयात थंडी वाढू लागल्याने वातावरणात हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीपासून बचावकरिता ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या आहेत तर दिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या अंगात उबदार कपडे दिसून येत (winter in maharashtra) आहेत.

नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका

नंदुरबारमध्येही अनेक जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच थंडीचा कडाकाही वाढला आहे. गेल्या अनेक दिवसापासून वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम झाला होता. ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी झाल्याने थंडी जाणवत नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसापासून आकाश निरभ्र झाल्याने गारठा वाढला आहे.

नागपुरात हुडहुडणारी थंडी 

नागपुरात सध्या हुडहुडणारी थंडी पडते आहे. विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. नागपुरात सध्या 8 अंशांनी तापमान खाली घसरत 5.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उत्तरी भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. या उत्तरी वाऱ्यांमुळेच 29 ते 31 डिसेंबरदरम्यान अवकाळी पाऊसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे

धुळे शहर थंडीने गारठले

धुळ्यातही अनेक ठिकाणी थंडीचा पारा चढला आहे. धुळे शहरही थंडींनी गारठले आहे. तापमानाचा पारा घसरला असून धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं  (winter in maharashtra)  आहे.