सहा वर्षांपासून विमानासोबत रिलेशनशीप, आता लग्नाची तयारी, एका वेड्या प्रेयसीची कहाणी

| Updated on: Jan 27, 2020 | 5:19 PM

जर्मनीमध्ये एक विचित्र प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. जर्मनीची एक महिला एका विमानासोबत लग्न करणार आहे.

सहा वर्षांपासून विमानासोबत रिलेशनशीप, आता लग्नाची तयारी, एका वेड्या प्रेयसीची कहाणी
Follow us on

बर्लिन : जर्मनीमधील एक विचित्र प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. जर्मनीची एक महिला एका विमानासोबत लग्न करणार आहे. मिशेल कॉबेक (Michele Köbke) असं या महिलेचं नाव आहे. ती जर्मनीच्या बर्लिन शहरात राहते. मिशेलचे गेल्या सहा वर्षांपासून या विमानासोबत प्रेमसंबंध आहेत. हा विमान बोईंग 737-800 आहे. हा विमान मिशेलच्या आयुष्यात सहा वर्षांपूर्वी आला. ती बोईंग 737-800 प्रेमाने Schatz म्हणते. Schatz हा एक जर्मन शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘डार्लिंग’ म्हणजेच जिवलग असा होतो (Michele Köbke Plane Love).

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, जर्मनीच्या बर्निल शहरात राहणाऱ्या मिशेल कॉबेकने जेव्हा पहिल्यांदा ही विमान पाहिला, तेव्हाच ती या विमानाच्या प्रेमात पडली. पाच वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मिशेलला पहिल्यांदा विमानाच्या पंखांना किस करण्याची संधी मिळाली.

आता मिशेल तिच्या 40 टन वजनाच्या या विमानासोबतच्या प्रेमसंबंधाला एक नाव देऊ इच्छिते. तिला या विमानाशी लग्न करायचं आहे. आतापर्यंत ती आपल्या या प्रेमी विमानाला फक्त दोनदा भेटली आहे. मिशेलजवळ बोईंग 737-800चा एक तुकडा आहे. याला ती नेहमी आपल्यासोबत ठेवते, इतकंच काय तर ती झोपतानाही त्या तुकड्यालासोबत घेऊन झोपते. मिशेलच्या मते, हे एखाद्या सामान्य रिलेशनशीपप्रमाणे आहे. ज्यात आम्ही संध्याकाळ सोबत घालवतो आणि रात्री सोबत झोपतो.

रिपोर्टनुसार, 30 वर्षीय मिशेलचे मित्र आणि कुटुंबातील लोकांनाही तिच्या विमानासोबतच्या नात्याबाबत कल्पना आहे. वैद्यकीय भाषेत अशा नात्याला ऑब्जेक्ट सेक्शुअॅलिटी किंवा ऑब्जेक्टोफिलिया असे म्हणतात. म्हणजे अशी स्थिती जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठल्या निर्जीव वस्तूकडे आकर्षित होतो. मिशेल ही एक सेल्सवुमन आहे आणि भविष्यात तिला विमान मेकॅनिक व्हायचं आहे.