World Music Day : बापाने पोराला डेडिकेट केलेलं मराठमोळं गाणं

सप्तसुरांच्या पलिकडले सुरेल गाऊ नवे तराणे,  ऐक बाळा तुला सांगतो, जीवन आपले असेल गाणे, असे या गाण्याचे बोल आहेत.

World Music Day : बापाने पोराला डेडिकेट केलेलं मराठमोळं गाणं
| Updated on: Jun 21, 2019 | 4:33 PM

World music day मुंबई : जागतिक संगीत दिन अर्थात वर्ल्ड म्युझिक डे आज जगभरात साजरा करण्यात येत आहे. आज जागतिक योग दिनाचा जसा उत्साह आहे, तसा म्युझिक डेचाही आहे. वेगवेगळ्या धाटणीचं म्युझिक जगासमोर यावं, शिवाय नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी म्युझिक डे एक निमित्त ठरतं. जगात शांतता नांदावी यासाठी फ्रान्समध्ये पहिल्यांदा 21 जून 1982 रोजी पहिला जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला होता.

संगिताचे विविध प्रकार आहेत. संगितातून भाव व्यक्त होतात. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून एका संगीतकाराने स्वत: संगीतबद्ध केलेलं गाणं आपल्या चिमुकल्या मुलाला डेडिकेट केलं आहे. श्रीरंग उऱ्हेकर असं या संगीतकाराचं नाव असून, त्यांनी त्यांचा मुलगा आरवला हे गाणं समर्पित केलं आहे.

सप्तसुरांच्या पलिकडले सुरेल गाऊ नवे तराणे,  ऐक बाळा तुला सांगतो, जीवन आपले असेल गाणे, असे या गाण्याचे बोल आहेत.

श्रीरंग उऱ्हेकर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, अभिषेक मारोतकर यांनी हे गाणं गायलं आहे. बाप-लेकाचे संगीत बंध या गाण्यातून प्रकर्षित होतात.

VIDEO