AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे वाचाच, उदयनराजेंचा तुम्हालाही अभिमान वाटेल!

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल सातारकरांसह महाराष्ट्राच्या मानात आदराचं आणि कुतुहलाचं स्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून उदयनराजेंची साताऱ्यात ओळख आहे. आपल्या हसत-खेळत स्वभावाने ते सगळ्यांची मनं जिंकतात. मात्र, उदयनराजेंनी काल जे केलं, त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल. खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 […]

हे वाचाच, उदयनराजेंचा तुम्हालाही अभिमान वाटेल!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल सातारकरांसह महाराष्ट्राच्या मानात आदराचं आणि कुतुहलाचं स्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून उदयनराजेंची साताऱ्यात ओळख आहे. आपल्या हसत-खेळत स्वभावाने ते सगळ्यांची मनं जिंकतात. मात्र, उदयनराजेंनी काल जे केलं, त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल.

खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. या दिवशी साताऱ्यात जल्लोष केला जातो. एखाद्या उत्सवासारखा उदयनराजेंचे समर्थक त्यांचा वाढिदवस साजरा करतात. त्यांच्या घराबाहेर असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी असते. मात्र, काल उदयनराजेंचा वाढदिवस असतानाही, कुठलाही उत्सव साजरा करण्यात आला नाही. कारण दहाच दिवसांपूर्वी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी पुलावामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देश दु:खात असताना वाजत-गाजत वाढदिवस साजरा करायचं, हे उदयनराजेंना मान्य नव्हते. मात्र, या वाढिदिवशी कार्यक्रम केला, मात्र तोही अनोखा.

कराडमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसानिमित्त पुलवामा हल्ल्याच्या पार्शवभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करुन  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शहीद कुटुंबीयांचा भव्य सन्मान सोहळा कार्यक्रम कराडच्या प्रीतीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांचे समाधी परिसारात आयोजित करण्यात आला होता.

उदयनराजेंनी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधीला अभिवादन करुन कार्यक्रमस्थळी पोहचून शहिदस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं आणि अभिवादन केले. यानंतर शहीद जवान कुटुंबीयांचा उदयनराजेंच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात  सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील एकूण 130 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा प्रशाकीय अधिकारी, नगरसेवक, समाजसेवक, पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी उदयनराजेंनी उपस्थितांशी संवादही साधला. या कार्यक्रमात काही खुर्च्या रिकाम्या दिसल्या. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, “शहिदांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात खुर्च्या मोकळ्या ही शोकांतिका आहे. लावणी असती तर जागा उरली नसती.”

“पुलवामा हल्ला झाला. अशा घटना रोज घडतात. याबाबत सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत. लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे, निवडणुका आल्या की सर्वाना पुळका येतो. जवानांना काही माहीत नसतं, आपलं काय होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेते जवानांचा वापर करुन घेतात.”, अशी खंतही उदयनराजेंनी व्यक्त केली.

वाढदिवशी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका मांडताना उदयनराजे म्हणाले, “कोण विचार करत नाही की, जवान अन्नपाणी घरदार सोडून पुढं येतात. पण आपण साडे नऊ वाजले की चला जेवायला असं करतो. ही मोठी शोकांतिका आहे. आपण जवानांच्या सुरक्षा, सन्मान यांच्यासाठी काय करतो? जवानांसारखा फक्त ड्रेस घालून बॉर्डरवर जाऊन दाखवा, त्या ठिकाणची परस्थिती भयानक आहे. जवानांचं त्याग, मनोधैर्य मोठं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन केलं.”

“शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांचा वारसा सांगून भागणार नाही, तर त्यांचा वसा पुढे नेण्याचं काम करणार आहे. जगायचं तर शिवबासारखं आणि मरायचं तर शंभुराजेंसारखं, मरायचं तर जवानासारखं.”, असे म्हणून उदयनराजेंनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

VIDEO : उदयनराजेंचं संपूर्ण भाषण :

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला