लिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 22, 2020 | 11:23 PM

आपण ज्यांना कोव्हिड योद्धा म्हणतो, तेच आपल्याला गरज असताना साथ देत नाहीत, असं बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले (Zareen Khan on Lilavati Hospital).

लिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : आपण ज्यांना कोव्हिड योद्धा म्हणतो, तेच आपल्याला गरज असताना साथ देत नाहीत, असं बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले (Zareen Khan on Lilavati Hospital). जरीन खानने या व्हिडीओच्या माध्यमातून लिलावती रुग्णालयावर नाराजी दर्शवली आहे. जरीनने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे (Zareen Khan on Lilavati Hospital).

“माझ्या आजोबांची तब्येत बिघडल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोव्हिड वॉर्डमध्ये टेम्परेचरने तपासणी केली असता ते नॉर्मल आले. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी आणि छातीचे सिटी स्कॅन करावे लागणार, त्यानंतरच त्यांच्यावर उपचार केले जाणार, असं तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. यावर मी प्रश्न उपस्थित केला. त्यावर रुग्णालयातील कर्मचारी म्हणाला, आमचा हा प्रोटोकॉल आहे आणि जर तुम्हाला तुमच्या आजोबांवर उपचार करायचे असतील तर प्रोटोकॉल फॉलो करावा लागणार”, असं रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सांगितले.

“रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वागणूकही चांगली नव्हती”, असंही जरीन खानने सांगितले.

“मी आतापर्यंत माझ्या मित्रांकडून ऐकलं की, काही झाले तरी रुग्णालयात जाऊ नकोस, त्यांनी या सर्व गोष्टींचा उद्योग केला आहे. त्यामुळे मी विचार केला की, ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करु”, असं जरीनने सांगितले.

“माझे आजोबा एवढे वयस्कर आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे. तरीही त्यांना समजत नाहीये. शेवटी आम्ही आजोबांना घरी घेऊन आलो आणि सकाळी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले”, असं जरीनने सांगितले.

संबंधित बातम्या :

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

Bollywood Drugs Case | “होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली