Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. (Marathi Actress Ashalata Wabgaonkar died due to corona)

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 8:53 AM

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Marathi Actress Ashalata Wabgaonkar died due to corona)

साताऱ्यातील लोणंद भागात सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरु होतं. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरुन एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. त्यानतंर सेटवरील जवळपास 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश होता.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली आणि पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. यामुळे मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे.

दरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासह 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात 16 कलाकार आणि इतर सेटवरील सहकाऱ्यांचा समावेश आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (Marathi Actress Ashalata Wabgaonkar died due to corona)

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.

संबंधित बातम्या : 

विराट-अनुष्का, तुम्ही उत्तम पालक व्हाल, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ‘ऑफलाईन’, सोशल मीडियावरुन ब्रेक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.