Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नूचा ग्लॅमरस अंदाज, ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये स्टायलिश फोटोशूट

अभिनेत्री तापसी पन्नूनं स्टायलिश अंदाजात फोटो शेअर केला आहे. (Actress Taapsee Pannu's glamorous look, stylish photoshoot in gray dress)

Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नूचा ग्लॅमरस अंदाज, ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये स्टायलिश फोटोशूट

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, तिनं ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोटो शेअर करत तिनं कॉन्फिडन्स असतो तरी काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तापसीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.या फोटोमध्ये तिनं मस्त गॉगल लावलेला असून ग्रे रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या ग्रे ड्रेससोबत तिनं हिरव्या रंगाची हिल्स घातली आहे. स्टायलिश अमनदीप कौरनं तापसीला हा लूक दिला आहे तर तिच्या बहिणीनं तिचा मेकअप केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

‘‘एका खोलीत बसून तुम्ही सर्वांपेक्षा चांगले आहात असा विचार करून आत्मविश्वास वाढत नाही. तर भरपूर लोकांच्या खोलीतून चालत स्वतःची तुलना त्या लोकांशी केली नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. हॅप्पी संडे. ” असं कॅप्शन देत तापसीनं हा फोटो शेअर केला आहे.

तापसी तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष देते. गेले अनेक दिवस ती जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात झळकणार आहे. या व्यतिरीक्त तिचा आगामी सिनेमा ‘लूप लपेटा’चं चित्रीकरणही सुरू आहे.

तापसीनं बॉलिवूडला आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस आली. त्यामुळे आता तापसीचा फॅनफॉलोईंग मोठी आहे.

‘रश्मी रॉकेट’साठी खास तयारी

आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘रश्मी रॉकेट’ साठी भरपूर मेहनत घेत आहे.’ थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं या चित्रपटातील तिचा लूक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. आता ती सातत्यानं या चित्रपटासाठीची तयारी करतानाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांना चकित केलं. ती पुणे- लोणावळा- मुंबई दरम्यान धावत प्रवास केला होता. तिनं ही बाब सोशल मीडियावर शेअर करताच तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसलं.