केस धुताना शॅम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ गोष्ट, हेअर फॉल होईल कमी
केस गळतीने त्रस्त आहात? हेअर फॉल कमी करण्यासाठी ही रेमेडी उपयुक्त ठरू शकते. शॅम्पूमध्ये हे एक मिश्रण मिक्स करून वापरल्याने फक्त केस गळती थांबणार नाही तर केसांचे आरोग्य देखील सुधारेल. हेअर ग्रोथसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे.

प्रत्येकाला लांब आणि दाट केस आवडतात. केस गळू नये, त्यांची योग्य वाढ व्हावी, ते दाट असावे यासाठी मुली बऱ्याच गोष्टी करत असतात. वेगवेगळे शॅम्पू, हेअर प्रोडक्ट वापरण्यासोबतच काही घरगुती उपायही केले जातात. तुम्ही सुद्धा केसांसाठी प्रभावी रेमेडी शोधत असाल तर हे एकदा ट्राय करून बघा. नेहमी वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये हे एक मिश्रण घाला आणि याने केस धुवा. याने केवळ केस गळती कमी होणार नाही तर केसांची वाढ देखील दुपटीने होईल. केसांच्या पूर्ण आरोग्यासाठी, विविध समस्यांसाठी हे खूप प्रभावी उपाय ठरू शकते.
शॅम्पूमध्ये मिक्स करा हे मिश्रण
जर तुमचे केस खूप गळत असतील, तुम्हाला लांब, दाट केस हवे असतील किंवा तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य सुधारायचे असेल, तर तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये या तीन घटकांचे मिश्रण मिक्स करा. चहापत्ती, तांदूळ आणि मेथीचे दाणे यापासून एक द्रावण तयार करा. हे मिश्रण तुमच्या शॅम्पूमध्ये मिक्स करा आणि केस स्वच्छ धुवा.
असे बनवा मिश्रण
एका पॅन किंवा कढईत चहापत्ती, तांदूळ आणि मेथीचे दाणे घ्या. हे सर्व तुम्हाला प्रत्येकी एक चमचा घ्यायचे आहे. आता यात दोन ग्लास पाणी टाका. आता हे मिश्रण मध्यम आचेवर उकळा. साधारण १० मिनिट हे चांगले उकळू द्या.
वापरण्याची योग्य पद्धत
हे मिश्रण उकळल्यानंतर थंड होऊ द्या. नंतर गाळून घ्या. आता तुम्ही वापरत असलेला कोणताही शॅम्पू या मिश्रणात मिक्स करा आणि याने केस धुवा.
किती दिवस साठवू शकता?
हे मिश्रण तुम्ही एकदा बनवून साधारण ३ ते ५ दिवस वापरू शकता. रूम टेम्परेचर मध्ये हे लवकर खराब होते, त्यामुळे हे फ्रिजमध्ये ठेवावे. तसं तर प्रत्येक वेळी हे ताजे तयार करणे उत्तम ठरेल.
मिळतात हे फायदे
– मेथी दाण्यांमध्ये असे घटक असतात जे केसांना सॉफ्ट बनवण्यास, टाळूतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात.
– चहापत्तीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे स्काल्प निरोगी ठेवण्यास आणि केसांना नैसर्गिकरित्या चमकदार बनविण्यात मदत करू शकतात.
– तांदळाचे पाणी केस मऊ करण्यास आणि हेअर ग्रोथमध्ये मदत करते.
– या मिश्रणाचा वापर केल्यामुळे केसांच्या विविध समस्या दूर होतात आणि केसांचे एकंदरीत आरोग्य सुधारते.