सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच मिळतील इतर अनेक फायदे

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपल्या शरीरातील अनेक समस्या दुर होतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊयात...

सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच मिळतील इतर अनेक फायदे
warm water
| Edited By: | Updated on: Aug 26, 2025 | 2:18 PM

पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. आरोग्य तज्ञांच्या मते प्रत्येकांने दररोज 3 लिटर पाणी प्यावे. पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवते. तसेच योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे सर्व भाग योग्यरित्या कार्य करतात. शरीराच्या डिटॉक्ससाठी देखील पाणी आवश्यक आहे. पाणी पिण्यामुळे पोट, आतडे स्वच्छ होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. बरेचदा लोकं सकाळी उठल्यानंतर थंड किंवा सामान्य पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की थोडेसे कोमट किंवा गरम पाणी प्यायल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कोमट पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे

– काही लोक सकाळी उठल्यानंतर पहिले चहा पितात तर काहीजण कॉफी पितात. तर काहींना सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय असते, परंतु थंड पाण्याऐवजी थोडे गरम पाणी प्यायल्यास त्याचे आणखी जास्त फायदे तुमच्या शरीराला होत असतात. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण काहीही न खाता किंवा न पिता रिकाम्या पोटी ऑफिस, शाळा, कॉलेजमध्ये जातात. तर ही सवय कालांतराने आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

– गरम पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी दिवसाची सुरुवात नक्कीच गरम पाणी पिऊन करावी. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहते. बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू दूर होते.

– रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने दिवसभरात तुम्ही जे काही सेवन करता ते योग्यरित्या पचते आणि तुमचे शरीर हलके राहते. तसेच चयापचय यामुळे तुमचे वजन देखील नियंत्रणात राहू शकते. पोटात गॅस, जडपणा किंवा जळजळ होण्याची तक्रार दूर होईल.

-गरम पाणी शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. गरम पाणी प्यायल्याने घाम येतो. ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. जेव्हा तुमचे शरीर आतून स्वच्छ असेल तेव्हा त्याचा त्वचेवरही सकारात्मक परिणाम होईल. त्वचा चमकेल. चेहरा चमकदार राहील.

– याशिवाय पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात गरम पाणी प्यायल्याने खोकला-सर्दी, घसा खवखवणे, बंद नाक यापासून आराम मिळतो. जर तुम्ही पाण्यात थोडे मध आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यायले तर त्याचे फायदे शरीराला जास्त होतील.

– दिवसभर थकल्यानंतर संध्याकाळी घरी परतल्यावर तुम्ही गरम पाणी पिऊ शकता आणि जेवणानंतर झोपू शकता. यामुळे मन शांत होते. तुम्हाला चांगली झोप येते. सर्व थकवा दूर होतो. मानसिक ताण कमी होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)