उन्हाळ्यात ‘या’ गरम पदार्थांना थंड समजून खाण्याची करू नका चूक, जाणून घ्या

उन्हाळा सुरू झाला की आपण अशा गोष्टी खाण्यास अधिक भर देतो ज्यामुळे आर्द्रतेपासून शरीराला आराम मिळतो. यामुळे लोकं या दिवसांमध्ये जास्त करून बर्फ, आईस्क्रीम सारख्या गोष्टी खातात, परंतु बर्फाचे स्वरूप उष्ण असते. त्याचप्रमाणे असे अनेक पदार्थ आहेत जे थंड स्वरूपाचे आहेत असे समजून खाल्ले जातात, परंतु प्रत्यक्षात या पदार्थांमध्ये उष्ण स्वरूप जास्त असतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण गरम पदार्थांबद्दल जाणून घेऊयात..

उन्हाळ्यात या गरम पदार्थांना थंड समजून खाण्याची करू नका चूक, जाणून घ्या
veggies
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 11, 2025 | 3:42 PM

ऋतूनुसार योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. यामूळे आपले आरोग्य चांगले राहते. तसेच उन्हाळा सुरू झाल्याने या दिवसात आपले शरीर लवकर डिहायड्रेट होते. यामुळे शरीराचे तापमान वाढण्यासोबतच अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तुम्हाला उष्णतेवर मात करायची असेल, तर तुम्ही अशा गोष्टी खाव्यात ज्या तुम्हाला उष्णतेपासून तात्काळ आराम देतातच, शिवाय पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तसेच असे काही पदार्थांचे सेवन करा ज्यामध्ये तुमच्या शरीराला थंडावा देखील मिळतो. उन्हाळा सुरू होताच, बर्फ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन केले जातात ज्यामुळे त्वरित आराम मिळतो, परंतु प्रत्यक्षात बर्फाचे स्वरूप उष्ण असते. त्याचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तर आजच्या या लेखात आपण अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ ज्यांचा स्वरूप खुप उष्ण असते, परंतु लोकं हे पदार्थ थंड आहेत असे समजून खातात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही पाण्याने समृद्ध असलेले पदार्थ आहाराचा भाग बनवावेत. जसे काकडी, भोपळा, टरबूज, कलिंगड, सत्तू सरबत, बडीशेप सरबत, लिंबू पाणी, नारळ पाणी. हे पदार्थ आणि पेये निसर्गतः थंडगार असतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात.

दुध

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येत दूध पिणे महत्वाचे आहे. कारण दूध साधारणपणे प्रत्येक ऋतूत वापरले जाते, पण तुम्हाला माहिती आहे का की दुधाचे स्वरूप उष्ण असते. सध्या उन्हाळ्यातही दूध पिणे फायदेशीर आहे कारण ते अनेक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे.

दही

उन्हाळ्यात दही भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. आपल्यापैकी अनेकांना जेवणात दहीचे सेवन करतात. तर या दिवसांमध्ये रायता आणि लस्सी बनवण्यासाठी दह्याचा वापरले जाते. कारण आपल्यापैकी अनेकांना वाटते की दह्याचा परिणाम थंड असते. पण दही हे निसर्गत: उष्ण आहे, परंतु प्रोबायोटिक असल्याने, उन्हाळ्यात आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेल्या चीज आणि देशी तुपाचे स्वरूपही उष्ण असते.

तुळस

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशी अनेक घरगुती उपायांमध्ये देखील वापरली जाते. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे सेवन करणारे किंवा त्याचे पाणी पिणारे बरेच लोकं आहेत, परंतु तुळशीचे स्वरूप उष्ण आहे आणि उन्हाळ्यात त्याचे जास्त सेवन आरोग्यास नुकसान पोहोचवू शकते.

आंबा

उन्हाळ्याच्या दिवसात आंबे खाल्ले नाहीत तर हा ऋतू अपूर्णच राहीला असे वाटेल. कारण बहुतेक लोकांना आंबे खायला खूप आवडतात. पण आंबा हा फळ चवीला गोड असला तरी यांचे स्वरूप मात्र उष्ण फळ आहे. जास्त आंब्यांचे सेवन केल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

मध

मध हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते आणि लोकं प्रत्येक ऋतूत मधाचे सेवन केले जाते. सध्या मध हा देखील असाच एक घटक आहे ज्याचा उष्ण प्रभाव असतो. उन्हाळ्यात त्याचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)