हिवाळ्यात लोणचे बनवताना टाळा ‘या’ पाच सामान्य चुका

हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये गाजर, मुळा, शलगम आणि कोबीचे लोणचे बनवले जाते. अशातच लोणच बनवताना तुम्ही या पाच चुका केल्यातर लोणचं लवकर खराब होते किंवा बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते, तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात लोणचं बनवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊयात.

हिवाळ्यात लोणचे बनवताना टाळा या पाच सामान्य चुका
pickles
Updated on: Nov 14, 2025 | 8:30 AM

आपल्या भारतीय जेवणात लोणचं हे असतेच. कारण लोणचं जेवणाची चव वाढवते. तर प्रत्येक ऋतू नुसार त्या त्या राज्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे लोणंच बनवले जाते. उन्हाळा ऋतूत आंब्याचे लोणचे आणि हिवाळ्यात गाजर, मुळा आणि कोबीचे लोणचे प्रत्येक भारतीय घरांमध्ये बनवले जाते. पराठे, भात आणि भाज्यांसोबत लोणचं आवडीने खाल्ले जाते. तर हे लोणचं तयार करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे ते स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनते. पण लोणचं बनवताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते. त्यात हिवाळ्यात लोणचे बनवणे ही प्रत्येक घरात एक सामान्य पद्धत आहे. परंतु एकाच मसाल्याचा वापर असतानाही मात्र लोणच्याची चव घरोघरी वेगवेगळी असते.

हिवाळ्यात खूप कष्टाने तयार केलेले लोणचे बहुतेकदा काही दिवसांतच खराब होते किंवा चवीला चांगले लागत नाही. लोणचे बनवताना झालेल्या काही चुकांमुळे लोणचं खराब होऊ शकते. या हिवाळ्यात लोणचे बनवताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून ते टिकून राहील आणि त्याची चव उत्तम लागेल. ते जाणून घेऊयात.

ओलाव्यामुळे लोणचं होते खराब

लोणचे बनवल्यानंतर काही दिवसांतच खराब होते. याचं मुख्य कारण म्हणजे ओलावा. जेव्हा भाज्या पूर्णपणे सुकलेल्या नसतात, त्यात जेव्हा थोडासा ओलावा राहतो. तेव्हा त्यातील पाण्यामुळे लोणच्यामध्ये बुरशी निर्माण होते. त्यामुळे लोणचे करण्यापूर्वी भाज्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात याची खात्री करा. तसेच लोणचं बनवताना ओले चमचे वापरणे टाळा, लोणच्याचे डबे घट्ट बंद करा आणि तेलाचा वापर जास्त करा कारण तेलाच्या कमतरतेमुळे लोणचे ओले होऊ शकते.

कच्चे मसाले मिक्स करणे

जेव्हा लोणचं बनवतात तेव्हा आपल्यापैकी काहीजण हे त्यात कच्चे मसाले मिक्स करातात. परंतु कच्चे मसाले लोणच्यात मिक्स केल्याने ते खराब होऊ शकते, कारण ते ओलावा आणि कच्चेपणा टिकवून ठेवतात. मेथी, मोहरी, बडीशेप, हळद, लाल मिरची यांसारखे लोणचे मसाले हलके भाजून घ्या जेणेकरून ओलावा निघून जाईल. नंतर ते बारीक वाटून घ्या. भाजताना मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या. मसाले थंड झाल्यानंतरच त्यात मिक्‍स करा.

लोणचं चुकीच्या पद्धतीने साठवणे

जेव्हा लोणचं बनवले जाते तेव्हा अनेकजण ते उन्हात ठेवतात. यामुळे मसाल्यांनी लोणच्याला चव येते आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते. सुरुवातीला लोणचे 4 ते 5 दिवस दररोज 3 ते 4 तास उन्हात ठेवा. त्यानंतर बरणी हलक्या हाताने हलवा जेणेकरून मसाले आणि तेल व्यवस्थित मिक्स होईल.

लोणच्याची बरणी स्वच्छ असावी

लोणचं जास्त काळ टिकून राहावे यासाठी लोणच्याची बरणी स्वच्छ आणि कोरडी असणे अत्यंत महत्वाचे आहे. लोक सहसा लोणचे कमी ओलावा असलेल्या बरणीमध्ये साठवतात, परंतु यामुळे बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते. लोणचे साठवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी तांबे किंवा सिरेमिकची बरणी वापरणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये लोणचे साठवणे टाळा, कारण यात लोणच्याला वास येऊ शकतो किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात.

तेल व्यवस्थित गरम न करणे

जर लोणचे बनवताना तेल व्यवस्थित गरम केले नाही तर लोणच्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. मोहरीचे तेल धुर येईपर्यंत गरम करा. ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर लोणच्यात मिक्स करा. लक्षात ठेवा लोणच्यामध्ये तेल अधिक प्रमाणात वापरावे. तेल नेहमी मिश्रणाच्या वरपर्यंत असावे यामुळे लोणचं वर्षानुवर्षे तसेच राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)