Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरासह तुम्ही या धार्मिक स्थळांनाही देऊ शकता भेट

| Updated on: Jan 16, 2024 | 4:21 PM

Ayodhya Temples : श्री रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिरावर निर्णय आल्यानंतर अयोध्येला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला वाव मिळत आहे. दररोज येथे हजारो लोकं येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही देखील अयोध्येला येण्याचा विचार करत असाल तर येथे पाहण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टी आहेत जाणून घ्या.

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरासह तुम्ही या धार्मिक स्थळांनाही देऊ शकता भेट
Follow us on

Ayodhya : 22 जानेवारी रोजी अयोध्येत भगवान रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील जवळपास सात हजार लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. यानंतर अयोध्येत येण्याची तयारी अनेकांनी केली आहे. २३ जानेवारीपासून राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. भव्य राम मंदिर पाहण्यासाठी लोकांच्या मनात उत्सूकता दिसत आहे. अयोध्येत फक्त राम मंदिर नाही तर इतरही सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट द्यायलाच हवी.

अयोध्या श्रीरामाचे जन्मस्थान आहे. सरयू नदीच्या काठी हे वसलेले आहे. अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले आहे, तेव्हापासून येथे पर्यटन खूप वाढले आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटनाबरोबरच येथे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. जर तुम्ही 22 जानेवारीच्या आसपास अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या सुंदर शहरातील या ठिकाणांना अवश्य भेट द्या.

त्रेता ठाकूर

त्रेता ठाकूर मंदिरात भगवान श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत, सुग्रीव यासह अनेक मूर्ती आहेत. हे मंदिर अयोध्येच्या नया घाटाजवळ आहे. या मूर्ती काळ्या वाळूच्या दगडापासून बनवल्या गेल्याचे मानले जाते. हे मंदिर 300 वर्षांपूर्वी कुल्लू राजाने बांधले होते. 1700 च्या दशकात मराठा राणी असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची दुरुस्ती करून नवीन रूप दिले होते.

छोटी छावनी

वाल्मिकी भवन किंवा पीर मणिराम दास छावनी म्हणूनही ओळखली जाते. ही अयोध्येच्या भव्य वास्तूंपैकी एक आहे. तुम्ही अयोध्येत आलात तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या, इथे तुम्हाला जुन्या गुहा पाहायला मिळतील. छोट्या छावणीत एकूण 34 लेणी आहेत, 12 बौद्ध मंदिरे, मध्यभागी 17 हिंदू मंदिरे आणि उत्तरेला 5 जैन मंदिरे आहेत.

तुलसी स्मारक इमारत

हे तुळशी स्मारक १६ व्या शतकातील संत कवी गोस्वामी तुलसीदास यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले. याच भव्य ठिकाणी तुलसीदासजींनी रामचरित रचले. हे एक विशाल ग्रंथालय आहे जिथे तुम्हाला साहित्याचा खजिना पाहायला मिळेल. जर तुम्हाला पुस्तक वाचनाची आवड असेल तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. येथे तुम्हाला अयोध्येतील साहित्य, संस्कृती आणि अध्यात्माची माहिती मिळेल. हे स्मारक रामायण कला आणि हस्तकला प्रदर्शित करते.

बहू बेगमची कबर

बहू बेगमची समाधी पूर्वीचा ताजमहाल म्हणूनही ओळखली जाते. फैजाबादच्या सर्वात उंच वास्तूंमध्ये त्याची गणना होते. ही समाधी अवधच्या प्रसिद्ध वास्तुकलेचे अनोखे प्रदर्शन आहे. हे 1816 मध्ये बांधण्यात आले होते, त्यावेळी या मंदिराची एकूण किंमत 3 लाख रुपये होती. या थडग्याच्या माथ्यावरून संपूर्ण शहराचे उत्कृष्ट दृश्य पाहता येते.

गुप्तर घाट

हा घाट सरयू नदीच्या काठावर आहे ज्याला घग्गर घाट असेही म्हणतात. फैजाबादजवळील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी गुप्तर घाटाच्या पायऱ्यांजवळ कंपनीची बाग होती, जी आता गुप्तर घाट जंगल म्हणून ओळखली जाते. याच ठिकाणी प्रभू रामाने ध्यान केले आणि जलसमाधी घेतली, त्यानंतर श्रीरामांना वैकुंठाची प्राप्ती झाली.