ग्रीन टीमध्ये मिसळा ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी, होतील आश्चर्यकारक फायदे

| Updated on: Mar 21, 2021 | 2:13 PM

वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे.

ग्रीन टीमध्ये मिसळा या आयुर्वेदिक गोष्टी, होतील आश्चर्यकारक फायदे
ग्रीन टी
Follow us on

मुंबई : वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र, नुसती ग्रीन टी पिण्यापेक्षा त्यामध्ये काही आयुर्वेदिक गोष्टी मिसळा यामुळे आपल्या आरोग्याला अधिक फायदे होई शकतात. (Ayurvedic things mixed in green tea will have health benefits)

-मध साखरेसाठी एक निरोगी पर्याय आहे. म्हणून, आपल्या ग्रीन टीमध्ये गोडवा आणण्यासाठी मध एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमच्या ग्रीन टीचा कडवटपणा कमी होतो. ग्रीन टीमधील अँटी ऑक्सिडेंट्स आणि मधातील मुबलक जीवनसत्त्वे व खनिजे एकत्र येऊन, हे एक सुपर हेल्दी ड्रिंक बनते. तसेच, मधयुक्त ग्रीन टी त्वचेच्या समस्या दूर करतो

-जेव्हा ग्रीन टीमध्ये आले मिसळले जाते, तेव्हा तिचे आरोग्यादायी फायदे आणखी वाढतात. वाढत्या प्रतिकारशक्तीबरोबरच आले कर्करोग रोखण्यासही मदत करते. हा चहा दमा, मधुमेह आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी देखील वापरला जातो.

-लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा.

-ग्रीन टीमध्ये पुदीनाची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

(Ayurvedic things mixed in green tea will have health benefits)