Baby Girl Name: मुलीच्या नावाचा विचार करताय तर ही आहेत काही आध्यात्मिक नावे

| Updated on: Feb 12, 2024 | 6:50 PM

तुम्ही जर मुलीचे नाव ठेवण्यासाठी काही नावांचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे घेऊन आलो आहोत. ही नावे अध्यात्माशी संबंधित आहेत. ही नावे तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकतात. मुलींची नावे आणि त्याचा अर्थ यामध्ये सांगितला गेला आहे.

Baby Girl Name: मुलीच्या नावाचा विचार करताय तर ही आहेत काही आध्यात्मिक नावे
Follow us on

मुंबई : तुमच्या घरात जर लक्ष्मीचं आगमन झाले असेल तर त्या मुलीचं नाव काय असावे याचा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला आज काही नावे सुचवणार आहोत. ही नावे सकारात्मक अर्थ असलेली नावे आहेत. नावाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होत असतो. त्यामुळे नाव ठेवताना खूप विचार करुन नाव ठेवले पाहिजे. हिंदू धर्मात अध्यात्माला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला अध्यात्मात रस असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीला हे नाव देऊ शकता. ज्याचा अर्थ विशेष आहे.

अद्रिजा

अद्रिजा हे पार्वतीचे नाव आहे. माता पार्वती या हिमालयाच्या कन्या होत्या, म्हणून त्यांचे नाव अद्रिजा होते.

अमारा

अमारा हे ग्रीक नाव आहे. लॅटिन संस्कृतशी त्याचा संबंध आहे. ज्याचा अर्थ अमर किंवा कृपाळू असा होतो.

अनाहिता

अनाहिता हा पारसी शब्द आहे. याचा अर्थ शुद्ध असा होतो. परंतु त्याच्या अर्थानुसार हे नाव मुलीला दिले जाऊ शकते.

देविना

देविना या नावाचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. हे नाव तुमच्या लाडक्या मुलीसाठी निवडले जाऊ शकते.

दित्या

दित्या नावाचा अर्थ संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणजेच माँ लक्ष्मी. तुम्ही तुमच्या मुलीला दित्यासारखे सकारात्मक नाव देऊ शकता.

नित्या

नित्या हे दुर्गा देवीचे नाव आहे. ज्याचा अध्यात्माशी संबंध आहे. तुम्ही तुमच्या मुलीला हे नाव देऊ शकता.

हव्या

तुम्ही तुमच्या मुलीला हे सुंदर आध्यात्मिक नाव देऊ शकता. दुर्गा देवीचे हे नाव आहे.

प्रमा

प्रमा हे नाव संस्कृतमधून आले आहे. म्हणजे सत्याचे ज्ञान. सकारात्मक अर्थ असलेले हे नाव मुलीसाठी पूर्णपणे योग्य आहे.

साव्या

पौराणिक मान्यतेनुसार सव्या हे नाव विष्णूचे नाव आहे. या नावावरून साव्या हे आधुनिक नाव पडले आहे. जे कन्येला देता येईल.

शैव्य

शैव्य नावाचा अर्थ शुभ किंवा श्रीमंत असा होतो. तुम्ही तुमच्या मुलीला हे नाव देऊ शकता.

श्रव्या

श्रव्या नावाचा अर्थ संगीताची टिप, श्रवणीय. संगीताशी संबंधित हे सुंदर नाव तुमच्या मुलीला द्या.