Skin Care : हे कधीही करू नका, त्वचेला थेट लिंबू लावू नका, वाचा कारण काय?

| Updated on: Jul 16, 2021 | 2:58 PM

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय नेहमीच करतो. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा काही चुका करतो. ज्यामुळे त्वचा सुंदर होण्यापेक्षा त्वचेच्या इतर समस्या सुरू होण्यास सुरूवात होते.

Skin Care : हे कधीही करू नका, त्वचेला थेट लिंबू लावू नका, वाचा कारण काय?
लिंबू चेहऱ्याला थेट लावणे चुकीचे
Follow us on

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय नेहमीच करतो. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा काही चुका करतो. ज्यामुळे त्वचा सुंदर होण्यापेक्षा त्वचेच्या इतर समस्या सुरू होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे त्वचा अधिक खराब होते. बरेच लोक चेहऱ्यावर लिंबू थेट लावतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, लालसरपणा आणि चट्टे येण्यास सुरूवात होते. (Applying lemon directly to the skin is harmful)

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम येण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, असेही नाही की, लिंबू आपल्या त्वचेसाठी चांगले नाही. लिंबू आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण लिंबू कधीही थेट चेहऱ्यावर लावू नये. चेहऱ्यावर जर पिंपल्सची समस्या असले तर आपण दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे बेसन पीठ मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे.

आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची समस्या असेल तर आपण दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजेत. जर त्वचेवर टॅनिंग झाली असेल तर अवघ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या दोन गोष्टी मिसळून फेस मास्क बनवू शकता. 3 चमचे काकडीचा रस, 1 चमचा लिंबाचा रस ज्या ठिकाणी टॅनिंग झाली आहे तेथे हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने लावा. एकदा हे मिश्रण लावल्यावर 2 ते 3 मिनिटे सुकण्यास द्या.

आपल्याला दिवसातून दोनदा ही प्रक्रिया करावी लागेल. दोन वेळांमध्ये किमान 4 तासांचे अंतर असले पाहिजे. याची आपली त्वचा पूर्णपणे बरे होण्यास आणि टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल. लिंबू आणि बटाटा दोन्ही त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करतात. तसेच, जर लिंबू अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियासारखे कार्य करते तर बटाटा मेलेनिनचे उत्पादन कमी करते. हे त्वचेला तजेलदार बनविण्यात मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Applying lemon directly to the skin is harmful)