नाक व हनुवटीवरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अवलंबवा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

नाक आणि हनुवटीभोवती असलेले ब्लॅकहेड्स चेहऱ्यावरील चमक कमी करतात. याशिवाय जर ते योग्यरित्या स्वच्छ केले नाहीत तर त्यामुळे पिंपल्स होऊ शकतात. यासाठी हे ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्सचा वापर केला जाऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात...

नाक व हनुवटीवरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अवलंबवा हे सोपे घरगुती उपाय
नाक व हनुवटीवरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अवलंबवा 'हे' सोपे घरगुती उपाय
Image Credit source: MarsBars/E+/Getty Images
| Edited By: | Updated on: Jun 11, 2025 | 4:59 PM

आपल्या चेहऱ्यावरील नाक आणि हनुवटीभोवती ब्लॅकहेड्स बरेच दिसत असतात. यामुळे त्वचा खडबडीत आणि दाणेदार दिसू लागते. बरेच लोकं ब्लॅकहेड्स काढण्यासाठी स्क्रबचा वापर जास्त करतात, पण अशावेळेस स्क्रबच्या अति वापराने त्वचेचे नुकसान होते. पण त्यानंतरही हे हट्टी ब्लॅकहेड्स सहजासहजी कमी होत नाहीत. यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी अनेक घरगूती गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.

सर्वप्रथम आपल्याला ब्लॅकहेड्स म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे… हेल्थलाइनच्या मते, तुमच्या स्किनच्या हेअर फॉलिकल्स जेव्हा ओपन होतात तेव्हा त्या भागात ब्लॅकहेड्स तयार होतात. प्रत्येक फॉलिकल्समध्ये केस आणि सेबेशियस ग्रंथी असतात ज्या तेल तयार करतात. सेबम नावाचे हे तेल त्वचेला मऊ करण्यास मदत करते.

मृत त्वचेच्या पेशी आणि हे तेल जेव्हा फॉलिकलच्या फॉलिकलमधून उघडते तेव्हा एक ढेकूळ तयार होते, ज्याला कॉमेडो म्हणतात. जर त्या ढेकूळाच्या वरील त्वचा बंद राहिली तर त्याला व्हाईटहेड्स म्हणतात. दुसरीकडे, जर त्या वरील त्वचा उघडी असेल आणि काळी दिसू लागली तर त्याला ब्लॅकहेड्स म्हणतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. तर हे ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी योग्य त्वचेची काळजी घेण्यासोबतच, काही घरगुती उपाय देखील मदत करू शकतात.

दिवसातून दोनदा चेहरा धुवा

चेहऱ्यावर साचलेल्या तेल आणि घाणीमुळे ब्लॅकहेड्स तयार होऊ शकतात. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, दिवसातून दोनदा तुमचा चेहरा धुवा. रात्री तुमच्या चेहऱ्यावर साचलेली घाण किंवा बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी सकाळी चेहरा धुवावा. दिवसभर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या स्किनटोननुसार फेसवॉश लावा.

पोअर स्ट्रिप्स

आजकाल ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही पोअर स्ट्रिप्स वापरू शकता . ही एक प्रकारची स्ट्रिप आहे, जी त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि घाण काढून टाकण्यासाठी वापरली जाते. ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर ती लावा. पोअर स्ट्रिप्स लावल्यानंतर 10 मिनिटे थांबा आणि हळूहळू काढून टाका. नाकाजवळील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी याचा वापर केला जातो.

या टिप्स फॉलो करा

नाक आणि हनुवटीवरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करा. यामुळे त्वचेवर साचलेली घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. यासोबतच ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी क्ले मास्क आणि चारकोल मास्कचा वापर केला जातो. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे क्ले मास्क उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही ते वापरावे.

घरगुती उपचार

यासोबतच काही घरगुती उपायांमुळे हे हट्टी ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ, बेकिंग सोडा, दही आणि ओटमील फेस पॅक आणि इतर अनेक गोष्टी वापरू शकता. पण ते तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार वापरावेत. कारण अनेकांना काही नैसर्गिक गोष्टींची अॅलर्जी असू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)