Coconut Water : नारळाचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 

| Updated on: Sep 12, 2021 | 12:23 PM

आपल्या सर्वांना माहित आहे की नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. जर तुमची त्वचा पावसाळ्यात कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी नारळाच्या पाण्याचे काही आश्चर्यकारक सौंदर्य हॅक्स सांगणार आहोत.

Coconut Water : नारळाचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 
नारळाचे पाणी
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. जर तुमची त्वचा पावसाळ्यात कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी नारळाच्या पाण्याचे काही आश्चर्यकारक सौंदर्य हॅक्स सांगणार आहोत. जे तुम्ही घरी सहज वापरून पाहू शकता. आपण नारळाचे पाणी कसे त्वचेसाठी वापरू शकता हे बघूयात. (Coconut water is beneficial for skin and hair)

कोरड्या त्वचेसाठी

पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. म्हणून नारळाचे पाणी वापरणे खूप फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेला पोषण आणि मॉइस्चराइज करण्यास मदत करते. त्यात असणारी साखर आणि अँटी-ऑक्सिडंट्स चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. तसेच नारळाचे पाणी स्प्रे बाटलीमध्ये भरून आपण दिवसातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर फवारू शकता. नारळाचे पाणी आणि गुलाबी मिक्स करून चेहऱ्याला लावा.

ब्रेकआउट फेसपॅक

नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि एमिनो अॅसिड भरपूर असतात. हे आपल्या त्वचेमध्ये एक उपचार गुणधर्म म्हणून कार्य करते. त्यात असलेले अँटी मायक्रोबियल गुणधर्म मुरुमांशी लढण्यास मदत करतात. याशिवाय जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नारळाच्या पाण्यात हळद आणि चंदन वापरू शकता. हे मिश्रण मुरुमाच्या भागात लावा आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवा.

केस गळण्याची समस्या दूर होते

नारळाचे पाणी त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा वापर करून, रक्ताभिसरण वाढवता येते. नारळाच्या पाण्याने टाळूची मालिश केल्याने केसांना पोषण मिळते आणि केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. यात हायड्रेटिंग गुणधर्म आहेत. हे तुमच्या केसांमध्ये नैसर्गिक कंडिशनिंग एजंट म्हणून काम करते.

नारळपाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते!

मधुमेहाच्या आजारात नारळाच्या पाण्याचा काय परिणाम होतो, याबद्दल कोणतेही विशिष्ट संशोधनम अद्याप झालेले नाही. परंतु प्राण्यांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामिन सी इंसुलिनचे प्रमाण सुधारण्यास मदत करते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयोगी ठरते.

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स

(Coconut water is beneficial for skin and hair)