विना मेकअप लूकमध्येही दिव्यांका दिसते खूप सुंदर… त्वचेच्या सौदर्यांसाठी दिव्यांकाने सोडली आवडती गोष्ट; जाणून घ्या, काय आहे टीव्ही अभिनेत्रीच्या सौंदर्यांचे रहस्य!

टिव्हीवरील मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री कीती सुंदर आणि सुडौल दिसतात याबाबत प्रत्येच गृहिणीला नेहमी अप्रुप वाटत असते. परंतु, या अभिनेत्रींना आपला फिटनेस आणि त्वचेच्या सुंदरतेसाठी खुप मेहनत घ्यावी लागते. जाणून,घ्या टिव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आपल्या सुंदर त्वचेसाठी काय काय करते.

विना मेकअप लूकमध्येही दिव्यांका दिसते खूप सुंदर... त्वचेच्या सौदर्यांसाठी दिव्यांकाने सोडली आवडती गोष्ट;  जाणून घ्या, काय आहे टीव्ही अभिनेत्रीच्या सौंदर्यांचे रहस्य!
विना मेकअप लूकमध्येही दिव्यांका दिसते खूप सुंदरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:31 AM

ईशिता म्हणून घराघरात पोहचलेली दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही मालिकेतील अभिनेत्री फीटनेस आणि सौदर्याच्या (Fitness and beauty) बाबतीत सर्वच विवाहीत महिलांची रोल मॉडल ठरावी अशीच आहे. दिव्यांका नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला शो बिजच्या दुनियेत 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण तिच्या सौंदर्यातही काळानुरूप वाढ होत आहे. दिव्यांका अनेकदा तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये मेकअप नसतानाही तिची त्वचा चमकदार आणि नितळ (Skin glowing and smooth) दिसते. पण दिव्यांकाला हे सौंदर्य नुसतं मिळालं नाही. यासाठी तिने स्किन केअर रूटीन (Skin care routine) फॉलो करण्यासोबतच आपल्या आहारातून आवडत्या गोष्टीही काढून टाकल्या आहेत. तुम्हालाही दिव्यांकासारखे सुंदर दिसायचे असेल तर तिच्या या ब्युटी टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

हर्बल उत्पादनांचा वापर

दिव्यांकाला आपल्या त्वचेबाबत तडजोड करणे आवडत नाही. ती तिची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हर्बल उत्पादने वापरते. याशिवाय ती जेव्हाही शूटवर जाते तेव्हा ती मॉइश्चरायझर आणि टोनर नक्कीच वापरते. कामावरून परतल्यानंतर, ती आपला चेहरा क्लिंजिंग लोशनने स्वच्छ करते, त्यानंतर फेस वॉश करते. त्यानंतर मॉइश्चरायझर आणि टोनर वापरते. दिव्यांकाचे मत आहे की, तुम्हाला घराबाहेर जायचे असो वा नसो, पण झोपण्यापूर्वी त्वचा नक्कीच स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर आणि टोनरचा वापर करा.

निरोगी आहार घेते

केवळ उत्पादनावर अवलंबून राहून त्वचा निरोगी बनवता येत नाही, यासाठी तुम्हाला आरोग्यदायी आहाराचीही गरज आहे, असे दिव्यांकाचे मत आहे. दिव्यांकाला सलाड, फळे इत्यादी कच्च्या गोष्टी खायला आवडतात. याशिवाय, फेसमास्क, मॉइश्चरायझर आणि टोनर व्यतिरिक्त, ती त्वचेवर कच्च्या फळांचा रस आणि कच्चे दूध देखील वापरते. शूटिंगदरम्यान दिव्यांकाला कॅमेऱ्यानुसार मेकअप करावा लागतो, पण खऱ्या आयुष्यात तिला हेवी मेकअप आवडत नाही. तिला हलका मेक-अप करायला आवडतो आणि त्यासाठी ती जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करते.

हे सुद्धा वाचा

आवडता चहा सौंदर्यासाठी सोडला

दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला दिवसातून 8 ते 10 कप चहा पिण्याची सवय आहे. पण एक वेळ अशी आली की, तिला चहा सोडावा लागला. चहा सोडल्याचा फरक काही वेळातच तिच्या त्वचेवर दिसू लागला. दिव्यांका म्हणते की, जास्त चहा प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, तसेच साखरेमुळे IGF1 हार्मोन वाढते, ज्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे पिंपल्सची समस्या सुरू होते. दुसरीकडे, जास्त चहा प्यायल्याने तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. चहामध्ये असलेली साखर तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारी बनवते. तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर चहा पिणे बंद करा. याशिवाय गोड पदार्थही कमी खाण्याचा ती सल्ला देते.

Non Stop LIVE Update
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.