डेड स्किनमुळे चेहऱ्यावरील ग्लो गेलायं? मग ‘हे’घरगुती उपाय नक्की ट्राय करा

| Updated on: Jun 19, 2021 | 5:47 PM

बदलत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा तेलकट, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता वाढते. त्यामध्येही या हंगामात डेड स्किन मोठ्या प्रमामात होते.

डेड स्किनमुळे चेहऱ्यावरील ग्लो गेलायं? मग ‘हे’घरगुती उपाय नक्की ट्राय करा
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : बदलत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा तेलकट, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता वाढते. त्यामध्येही या हंगामात डेड स्किन मोठ्या प्रमाणात होते. डेड स्किनमुळे आपल्या चेहऱ्यावरील ग्लो देखील जातो. चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो परत आणण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत. (Do this home remedy to get rid of the problem of dead skin)

डेड स्किन काढण्यासाठी मध आणि दही मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण तीस मिनिटांनी स्क्रब करत हलक्या हाताने चेहरा मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आपण साधारण आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
तांदळाचे जाडसर पीठ तयार करण्यासाठी चार ते पाच चमचे तांदूळ घ्या आणि जाडसर वाटा. या पेस्टमध्ये दूध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे लावा.

चेहऱ्यासोबत मानेवरही लावा. हलक्या हाताने गोलाकार दिशेमध्ये तीन ते चार मिनिटांसाठी त्वचेचा मसाज करावा. पेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी. यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघते. बेकिंग सोडा, मध आणि हळदे तयार केलेला हा स्क्रब तुमच्या त्वचेला पूर्णपणे शुद्ध करेल, त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. बेकिंग सोडा हा एक एक्सफॉलिएटर म्हणून काम करतं. हे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्समध्ये असलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतं. तर मधामुळे तुमची त्वचा मॉईश्चरायईज होते.

नारळाचे तेल, बदाम आणि साखर एका भांड्यात मिसळा आणि सुनिश्चित करा की साखर विरघळणार नाही. असमान टॅन असलेल्या जागी दानेदार मिक्सचरचा वापर करा आणि हळूच एका सर्कुलर मोशनमध्ये मालिश करा. समान प्रमाणानुसार आपण हे एक्सफोलीएटिंग स्क्रब अधिक प्रमाणात बनवू शकता आणि हे आपल्या शरीरावर उपयोग करु शकता. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्यास मदद करते. तर बदाम आणि साखर त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(Do this home remedy to get rid of the problem of dead skin)