Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा

| Updated on: Oct 11, 2021 | 7:44 AM

वृद्ध होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, बराच लोकांची त्वचा अगदी कमी वयामध्येच वृद्ध लोकांच्या त्वचेसारखी दिसते. काहींना आपली त्वचा तरुण ठेवण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. जर आपण निरोगी आहार, चांगली झोप आणि योग्य त्वचेची काळजी नियमित केली तर आपण निरोगी आणि तरुण त्वचा सहज मिळवू शकते.

Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : वृद्ध होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, बराच लोकांची त्वचा अगदी कमी वयामध्येच वृद्ध लोकांच्या त्वचेसारखी दिसते. काहींना आपली त्वचा तरुण ठेवण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. जर आपण निरोगी आहार, चांगली झोप आणि योग्य त्वचेची काळजी नियमित केली तर आपण निरोगी आणि तरुण त्वचा सहज मिळवू शकते.

1. सन प्रोटेक्शन

सनस्क्रीन सर्वोत्तम वृद्धत्वविरोधी उपाय आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण दररोज सनस्क्रीन लावली पाहिजे. यामुळे काळे डाग, रंगद्रव्य आणि सुरकुत्याची समस्या दूर होण्यास नक्की मदत मिळते. वृद्धत्वाची कोणतीही चिन्हे कमी करण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन (कमीतकमी एसपीएफ़ 30 सह) वापरण्याचा सल्ला दिला जातो.

2. झोप

जेव्हा आपण झोपत असतो. तेव्हा आपले शरीर स्वतःच दुरुस्त होते. झोपेच्या दरम्यान, तुमच्या त्वचेत रक्त प्रवाह वाढतो, आणि सुरकुत्या आणि डाग कमी होतात. प्रत्येकाने सुमारे सात ते नऊ तास झोप घेतली पाहिजे. लोकांमध्ये झोपेची खराब गुणवत्ता जीवनशैलीच्या इतर समस्यांशी संबंधित असू शकते जी बर्‍याचदा वृद्धत्वाशी संबंधित असतात.

3. नैसर्गिक स्क्रब

त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग आपली मृत त्वचा काढून टाकते. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, नारळ तेल आणि मध वापरू शकता. आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल.

4. त्वचेचीक्लिनिंग

जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.

5. लिंबू आणि टोमॅटो

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 5 special skin care tips)