
तळलेले पदार्थ टाळा - पकोडे, फ्रेंच फ्राईज, समोसे किंवा कचोरीसारखे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात. पण हे पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. हे रक्त परिसंचरणात अडथळा आणतात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. पुरळ कमी करण्यासाठी आपण तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.

प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा - सॅच्युरेटेड आणि ट्रान्स-फॅट्स युक्त पदार्थांमुळे त्वचेमध्ये सेबमचे उत्पादन वाढू शकते. यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होते. चिप्स, ड्रिंक्स आणि स्नॅक्स खाणे टाळा.

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ टाळा - काही पदार्थ जसे की कॉर्न सिरप, साखर, सॉस, केचअप, सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, ज्यूस टाळावेत. या पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येतो.

ओमेगा -3 समृध्द आहार - फ्लेक्ससीड, चिया बिया आणि फिश ऑइल हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे पदार्थ निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात आणि आपल्या शरीरासाठी देखील याचे अनेक फायदे आहेत.

झिंक समृध्द अन्न खा - झिंक युक्त पदार्थ जसे भोपळा बिया, ऑयस्टर आणि बीन्स यांचा आहारात समावेश केला पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.