
पावसाळा सुरू झाला की उष्णतेपासून आराम मिळतो, पण हा पावसाळा तुमच्या त्वचेसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. खरं तर या दिवसांमध्ये वातारणात आर्द्रता, घाम आणि धूळ यामुळे मुरुम, चेहऱ्यावा तेलकटपणा आणि चमक नसणे या काही सामान्य समस्या निर्माण होतात. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या टिप्स समाविष्ट करून तुम्ही या पावसाळा ऋतूचा आनंद घेत, तुम्ही निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. चला जाणून घेऊयात कोणत्या टिप्स आहेत ज्या रोजच्या स्किन केअर रूटिंगमध्ये समाविष्ट करून त्वचा चमकदार होईल.
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे त्वचा तेलकट होते. त्यामुळे त्वचेवर धूळ, घाण आणि घाम साचतो, ज्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम, पुरळ त्वचेवर येतात. तर पावसाळ्यात ही समस्या टाळण्यासाठी, दिवसातून कमीत कमी दोनदा (सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी) चांगल्या क्लींजरने चेहरा धुवा.
यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हलके क्लींजर निवडा आणि हलक्या हातांनी गोलाकार हालचालींमध्ये मसाज करा आणि थंड पाण्याने धुवा. यामुळे केवळ घाण निघून जाईलच, शिवाय त्वचा ताजीतवानी होईल.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर टोनर लावणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण टोनर हे तुमच्या त्वचेचे पीएच संतुलन राखण्यास आणि छिद्र कमी करण्यास मदत करते. अशातच पावसाळ्यात जेव्हा ओपन पोर्सची समस्या वाढते तेव्हा टोनर खूप उपयुक्त आहे.
ते वापरण्यासाठी, कापसाच्या बोळ्यावर थोडे टोनर घ्या आणि ते संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावा. अल्कोहोल नसलेले टोनर वापरा, विशेषतः जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर.
पावसाळ्यात हवेत दमटपणा असल्याने मॉइश्चरायझरची गरज नसते असे अनेकांना वाटते, परंतु हा गैरसमज आहे. आर्द्रता असूनही तुमच्या त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. जड आणि चिकट मॉइश्चरायझरऐवजी, हलके, जेल-आधारित किंवा पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर निवडा.
क्लींजिंग आणि टोनिंग केल्यानंतर, चेहरा आणि मानेवर थोडेसे मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि ती तेलकट होणार नाही.
केवळ त्वचेची बाहेरून काळजी घेऊन चालणार नाही, तुमच्या त्वचेला आतूनही पोषणाची आवश्यकता असते. म्हणून पावसाळ्यात तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या.
भरपूर पाणी प्या: शरीर हायड्रेटेड ठेवल्याने त्वचा आतून निरोगी राहते.
फळे आणि भाज्या खा: व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंटयुक्त फळे जसे की बेरी, संत्री आणि हिरव्या भाज्या तुमची त्वचा आतून स्वच्छ आणि चमकण्यास मदत करतात.
प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम करू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)