AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : केसगळतीमुळे त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय अन् वाढवा केसांची चमक!

Hair care tips : केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. निरोगी केसांसाठी तुम्ही काही घरगुती गोष्टी करून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता... कोणते उपाय करता येतील? पाहा...

Hair Care Tips : केसगळतीमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय अन् वाढवा केसांची चमक!
निरोगी केस : अननस केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य राखण्यासाठी दररोज अननसाचे सेवन करा. यामुळे केस जाड आणि चमकदार होतात.
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 27, 2022 | 11:55 AM
Share

मुंबई : केस गळणं (hair fall), त्यांचं निस्तेज होणं, वाढ खुंटणं या खूप महिलांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण त्यामुळे तुमचे केस अधिकच निस्तेज होऊ लागतील त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि केसांचं आरोग्य सुदृढ राखा… मजबूत केसांसाठी चांगला आहार (Healthy diet)  घेणं खूप महत्त्वाचा आहे. पुरेशा प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आणि झिंक, अंडी, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांमध्ये आढळते. रोज एक वाटी कोंब खा. त्यात अमिनो अॅसिड असते. हे केस निरोगी ठेवण्यास मदत करते. हे पोषक केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करतात. यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनतील.

गरम तेल मालिश

केसांच्या वाढीसाठी गरम तेलाचा मसाज आवश्यक आहे. केसांना गरम तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण वाढते. केसांना खूप वेगाने मसाज करणे टाळा. केसांना आणि त्वचेला कोमट तेल लावा. हलक्या हाताने मसाज करा. तेलांचे स्वतःचे विशेष गुणधर्म आणि फायदे आहेत. या तेलामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. तेल लावल्यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवा. पाणी पिळून घ्या आणि डोक्याला टॉवेल गुंडाळा.  5 मिनिटं तसंच राहू द्या. याने तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतील.

केस किती वेळा धुवावेत

तेलकट केस आठवड्यातून 3 वेळा आणि कोरडे केस 2 वेळा धुवावेत. केस धुण्यासाठी हर्बल शैम्पू वापरा. केस पाण्याने चांगले धुवा. शॅम्पू केल्यानंतर केस टॉवेलने झटकणे टाळा. काही मिनिटांसाठी टॉवेल डोक्याभोवती गुंडाळा आणि ओलावा शोषून घ्या. ओल्या केसांना कंगव्याने विंचारणे टाळा. हे केसांसाठी हानिकारक आहे. केसांसाठी रुंद दातांचा कंगवा वापरा. हेअर ड्रायरचा नियमित वापर टाळा आणि शक्य तितके आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या.

कांद्याचा रस लाभकारी

कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यात सल्फर असते. केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता. दक्षिण भारतात केसांची वाढ वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो. कढीपत्त्याची पेस्ट दह्यात मिसळून हेअर पॅक म्हणून वापरता येते. तुम्ही ते अॅलोवेरा जेलमध्ये मिसळून केसांना लावू शकता.

संबंधित बातम्या

तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत…

काय सांगता…टाईप-2 मधुमेह 90 दिवसांमध्ये बरा होता…जाणून घ्या यासाठी डाॅक्टरांनी नेमक्या कोणत्या टिप्स फाॅलो करायला सांगितल्या आहेत!

Health care : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा, सर्व समस्या दूर राहतील!

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?