Skin Care : दररोज सकाळी चेहऱ्याला मध-साखर लावा आणि मुलायमदार त्वचा मिळवा!

| Updated on: Jul 26, 2021 | 8:09 AM

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. सुंदर त्वचेसाठी विविध फेसपॅक, क्रिम आणि आैषधे लावतात, मात्र पाहिजे तशी त्वचा मिळतच नाही.

Skin Care : दररोज सकाळी चेहऱ्याला मध-साखर लावा आणि मुलायमदार त्वचा मिळवा!
मध आणि साखर चेहऱ्यासाठी फायदेशीर
Follow us on

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. सुंदर त्वचेसाठी विविध फेसपॅक, क्रिम आणि आैषधे लावतात, मात्र पाहिजे तशी त्वचा मिळतच नाही. जर चांगली त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक प्रकारे सुंदर आणि तजेलदार दिसण्यास मदत होईल. मध आणि साखर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Honey and sugar are extremely beneficial for the skin)

जर आपण दररोज सकाळी चेहऱ्याला मध आणि साखर मिक्स करून लावली तर आपली त्वचा सुंदर, चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. हे घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे साखर आणि तीन चमचे मध लागणार आहे. साखर आणि मध चांगला मिक्स करून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. मात्र, साखर विरघळण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे हे चेहऱ्यावर राहूद्या आणि हळूवार हाताने चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

सुंदर आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण घरच्या घरी स्क्रब तयार केला पाहिजे. साखर, टोमॅटो आणि गुलाब पाण्याचा स्क्रब चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा स्क्रब घरच्या घरी तयार करण्यासाठी तीन चमचे साखर, अर्धे टोमॅटो आणि गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम टोमॅटो आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करा त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करा आणि लगेचच चेहऱ्याला लावा. यावेळी साखर या पेस्टमध्ये विरघळणार नाही, याची काळजी घ्या.

अक्रोड, आवळा, मध सर्वात अगोदर अक्रोड बारीक करून घ्या. मात्र खूप जास्त बारीक करू नका कारण स्क्रबसाठी ग्रॅन्यूल आवश्यक आहेत. एक चमचा मध घ्या आणि आवळा बारीक करून आता हे सर्व मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात हे मिश्रण घ्या आणि स्क्रब करा. कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपला चेहरा स्क्रब करा आणि स्क्रबिंगनंतर 2 मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडा ठेवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Honey and sugar are extremely beneficial for the skin)