Skin | पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी मध फायदेशीर, या प्रकारे फेस मास्क तयार करा!

| Updated on: May 26, 2022 | 9:10 AM

लिंबू आणि मधाच्या मास्कने आपण पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासोबतच त्वचा मऊ मिळू शकतो. यासाठी एका भांड्यात दोन चमचे मध घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता हा मास्क पिगमेंटेशन प्रभावित त्वचेवर लावा आणि कोरडे राहू द्या. ते काढण्यासाठी कोमट पाणी वापरा आणि आठवड्यातून दोनदा हे करा.

Skin | पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी मध फायदेशीर, या प्रकारे फेस मास्क तयार करा!
Image Credit source: istockphoto.com
Follow us on

मुंबई : पिगमेंटेशनची (Pigmentation) समस्या निर्माण झाल्यास त्वचेचा टोन खराब होण्यास सुरूवात होते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करत असाल. मात्र, यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही अधिक जातात. परंतु पाहिजे तसा रिझल्ट देखील मिळत नाही. यामुळेच महागड्या प्रोडक्ट्सचा (Expensive products) वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय केले तर ते अधिक फायदेशीर ठरतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, हाच मध आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो. आपण मधाच्या मदतीने घरगुती अनेक फेस मास्क (Face mask) तयार करून त्वचेच्या समस्या दूर करू शकतो. इतकेच नाही तर मध त्वचेला आतून हायड्रेट करण्याचे काम करतो.

मध आणि लिंबू

लिंबू आणि मधाच्या मास्कने आपण पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासोबतच त्वचा मऊ मिळू शकतो. यासाठी एका भांड्यात दोन चमचे मध घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता हा मास्क पिगमेंटेशन प्रभावित त्वचेवर लावा आणि कोरडे राहू द्या. ते काढण्यासाठी कोमट पाणी वापरा आणि आठवड्यातून दोनदा हे करा. यामुळे काही दिवसांमध्येच पिगमेंटेशनची समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, दरवेळी पेस्ट ताजीच बनवा.

हे सुद्धा वाचा

अंडे आणि मध

एका भांड्यामध्ये एक अंडे फोडा, त्यात एक चमचा मध घालून फेटून घ्या आणि नंतर ब्रश किंवा हाताच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. हा फेस मास्क कोरडा होऊ द्या आणि काही मिनिटांनंतर थोडा वेळ मसाज करा. आठवड्यातून दोनदा हे करा आणि काही वेळाने तुम्हाला फरक दिसू शकेल. या खास फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासही मदत होते.

दही आणि मध

दह्यामध्ये असलेले ऍसिड त्वचेला आतून दुरुस्त करण्याचे काम करते. यासोबतच मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करतात. एका भांड्यात तीन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने काढून टाका. यामुळे आपली त्वचा आतून दुरूस्त होण्यास नक्कीच मदत मिळते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)