
Face Massage At Home Tips : आपला चेहरा सुंदर दिसावा असे कुठल्याही महिलेला आणि मुलीला वाटणे स्वाभाविक आहे. सुंदर आणि ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाणे खर्चिक वाटते. त्यामुळे चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी घरच्या घरी चेहऱ्याच्या मसाज हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. घरच्या घरी फेशियल मसाज कसा करायचा आणि यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते आपण जाणून घेऊ.
चेहरा स्वच्छ करा : मसाज करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून घ्या. जेणेकरून चेहऱ्यावरील सर्व धूळ घाण निघून जाईल आणि त्यानंतर मालिश केल्याने तेल किंवा क्रीम त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जाईल.
मसाज करण्यासाठी तेल किंवा क्रीमचा वापर करा : खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल याचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर एलोवेरा जेल किंवा हलके मॉइश्चरायजर देखील वापरू शकता यामुळे त्वचेचे पोषण आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.
मसाज करताना जास्त जोर लावू नका, हलक्या हाताने मसाज करा. दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला मसाज करणे पुरेसे आहे. मसाजदरम्यान शांत वातावरण असावे. तुम्ही यावेळी हलक्या स्वरुपाचे संगीतही ऐकू शकता जेणेकरून मनशांती लाभेल. मसाज केल्यानंतर शक्यतो उन्हात जाणे टाळा. कारण लगेच उन्हात गेल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.