Skin Care : त्वचेच्या टोननुसार मनुक्याचा फेस मास्क वापरा, जाणून घ्या फायदे!

| Updated on: Aug 18, 2021 | 8:48 AM

मनुक्याचा फायद्यांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. हे एक असे ड्राय फ्रूट आहे जे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मनुकामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

Skin Care : त्वचेच्या टोननुसार मनुक्याचा फेस मास्क वापरा, जाणून घ्या फायदे!
केसांची समस्या
Follow us on

मुंबई : मनुक्याचा फायद्यांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. हे एक असे ड्राय फ्रूट आहे जे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मनुकामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की द्राक्षे सुकवून मनुके तयार केली जातात. यात कोणत्याही प्रकारचे रसायन नसते. मनुक्याचे फेसपॅक नेमके कसे तयार करायचे हे आज आपण बघणार आहोत. (Raisin face mask beneficial for improving skin tone)

1. तेलकट त्वचेसाठी मनुका फेस मास्क

साहित्य

-मनुके

-लिंबाचा रस

-कोरफड

-मुलतानी माती

कृती

या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. जर तुम्हाला ही पेस्ट खूप जाड वाटली तर तुम्ही त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करू शकता. आता हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 25 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

2. सामान्य आणि कोरडी त्वचा

साहित्य

-मनुके

-दही

-काकडी

-दूध

-डाळीचे पीठ

-गुलाबाची पाने

कृती

सर्व प्रथम, या सर्व गोष्टी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा. यानंतर, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि किमान 20 मिनिटे सोडा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी, हा मास्क आठवड्यातून एकदा लावा.

मनुक्याचे फायदे

मनुक्यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, ते त्वचेला नवचैतन्य देण्याचे काम करते. काही अभ्यासानुसार, मनुका वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी काम करतात. याशिवाय हे त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करते. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते जे त्वचेवरील डाग, डाग दूर करण्यास मदत करते.

मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Raisin face mask beneficial for improving skin tone)