चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Jul 01, 2021 | 8:25 AM

चेहऱ्यावरील तीळ वेगळ्या प्रकारे सौंदर्य वाढवते. चेहऱ्यावर एक किंवा दोन तीळ चांगले वाटतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर त्यापेक्षाही अधिक तीळ येतात.

चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
चेहऱ्यावरील तीळ
Follow us on

मुंबई : चेहऱ्यावर एक किंवा दोन तीळ चांगले वाटतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर त्यापेक्षाही अधिक तीळ येतात. अशा परिस्थितीत सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होते. चेहऱ्यावरील हे तीळ काढण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपचार करतात पण चेहऱ्यावरील तीळ काही कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला काही स्पेशल उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे चेहऱ्यावरील तीळ जाण्यास नक्की मदत होईल. (Special remedy for facial mole removal)

चेहऱ्यावरील नको असलेले तीळ दूर करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा निरमा, हळद, मीठ आणि जिऱ्याची पावडर लागणार आहे. सर्वात अगोदर वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. चेहऱ्यावरील नको तीळावर लावा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट तिळांवर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. आपण ही पेस्ट सतत आठ दिवस तिळांवर लावली तर चेहऱ्यावरील तीळ जाण्यास नक्की मदत होईल.

लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तिळावर लावा. सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्यास तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. व्हिनेगरचा वापर करूनदेखील तीळ हटवले जाऊ शकतात. सुरूवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा. कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर तिळावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा. आल्याचे तुकडे ठेचून तिळाच्या जागी लावा. त्यावर कपडा बांधून झोपा. या उपायानेही तीळ कमी होण्यास मदत होते.

कांद्याचा रस केवळ केसांसाठी फायदेशीर नाही तर चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी कांद्याचा रस तीळावर कापसाच्या साहाय्याने लावावा व सुमारे दोन तासानंतर ते पाण्याने धुवा. हा उपाय दररोज करा आणि काही दिवसातच तुम्हाला तिळापासून मुक्तता मिळेल. कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हाला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करा. या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्‍यावरील तीळ कमी होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Special remedy for facial mole removal)