Hair | मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हे 3 हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Apr 24, 2022 | 11:00 AM

अॅव्होकॅडोचे तुकडे करा आणि त्याच्या बिया काढून टाका. त्यानंतर ते चांगले मॅश करून घ्या. आता ही पेस्ट आपल्या केसांवर आणि टाळूवर लावा. काही वेळ बोटांनी डोक्याला मसाज करा. दिड तास ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. यानंतर केस सौम्य केस धुवा, तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

Hair | मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हे 3 हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर!
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम म्हटंले की, त्वचेसोबतच केसांच्या (Hair) अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे केस गळणे, तुटणे आणि दोन तोंडी केस या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता, ते तुमचे केस मऊ (Soft Hair) होण्यास मदत करतील. मऊ केसांसाठी तुम्ही अॅव्होकॅडो वापरू शकता. अॅव्होकॅडो हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अॅव्होकॅडोच्या (Avocado) मदतीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरचे-घरी अॅव्होकॅडोचे कशाप्रकारे हेअर मास्क तयार करायचे.

अॅव्होकॅडोमुळे केसांच्या समस्या करा दूर

अॅव्होकॅडोचे तुकडे करा आणि त्याच्या बिया काढून टाका. त्यानंतर ते चांगले मॅश करून घ्या. आता ही पेस्ट आपल्या केसांवर आणि टाळूवर लावा. काही वेळ बोटांनी डोक्याला मसाज करा. दिड तास ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. यानंतर केस सौम्य केस धुवा, तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

अॅव्होकॅडो आणि केळी

अॅव्होकॅडो कापून ब्लेंडरमध्ये टाका. त्यानंतर केळी सोलून कापून घ्या आणि ब्लेंडरमध्ये टाका. चांगले मिसळा, केसांना आणि टाळूला लावा. केसांना थोडा वेळ मसाज करा. 30 ते 40 मिनिटे हे केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ धुवा. यामुळे केस तुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

अॅव्होकॅडो आणि दही

अॅव्होकॅडो घ्या आणि तो अर्धा कापून घ्या आणि मॅश करा. त्यात 2 ते 3 चमचे दही टाका, हा हेअर मास्क केसांमध्ये लावा. संपूर्ण केस आणि टाळूवर लावा. डोक्याला मसाज करा आणि 30 ते 40 मिनिटे राहू द्या, त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Egg | अंड्याचा पिवळा बलक तुम्हीही फेकून देता? वाचा मग याचे फायदे…

Vegetable : ‘या’ भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!