Skin care Tips : ‘ही’ 4 नैसर्गिक तेल सनस्क्रीनप्रमाणे काम करतात, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Aug 30, 2021 | 8:32 AM

सूर्यप्रकाशाचे अतिनील A आणि UV B किरण त्वचेसाठी हानिकारक असतात. या किरणांमुळे त्वचा निस्तेज होते आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. सूर्यप्रकाशामुळे सनबर्नची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत, ब्युटीशियन आणि त्वचा तज्ज्ञ बहुतेकदा सनस्क्रीन लावण्याची शिफारस करतात.

Skin care Tips : ही 4 नैसर्गिक तेल सनस्क्रीनप्रमाणे काम करतात, वाचा याबद्दल अधिक!
त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : सूर्यप्रकाशाचे अतिनील A आणि UV B किरण त्वचेसाठी हानिकारक असतात. या किरणांमुळे त्वचा निस्तेज होते आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. सूर्यप्रकाशामुळे सनबर्नची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत, ब्युटीशियन आणि त्वचा तज्ज्ञ बहुतेकदा सनस्क्रीन लावण्याची शिफारस करतात. सनस्क्रीनमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात. (These 4 natural oils are extremely beneficial for the skin)

जर तुम्हाला सनस्क्रीन लावायची नसेल तर तुम्ही काही नैसर्गिक तेल देखील वापरू शकता. होय, तिळाचे तेल, नारळाचे तेल, ऑलिव्ह तेल आणि बदाम तेल देखील सनस्क्रीन सारखी त्वचेची काळजी घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे इतर समस्यांपासून त्वचेचे रक्षण करू शकतात.

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे खाज, जळजळ आणि पुरळांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही टी ट्री ऑईल वापरू शकता. टी ट्री ऑईलमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे आपण ते सनस्क्रीन म्हणून वापरू शकता.

तीळाचे तेल

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण तिळाचे तेल वापरू शकता. यासाठी तुम्हाला तिळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब चेहऱ्यावर आणि काही थेंब मानेवर लावावे लागतील. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी तिळाचे तेल लावा. तिळाचे तेल त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

बदाम आणि ऑलिव्ह ऑईल

सूर्याचे हानिकारक किरण टाळण्यासाठी बदाम आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जाऊ शकतो. आपण सनस्क्रीनऐवजी ही दोन्ही तेले लावू शकतो. याशिवाय, हे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास देखील मदत करते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल सनस्क्रीन म्हणून वापरले जाऊ शकते. हे तुमच्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला पोषण देण्याचे काम करते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता.

सनस्क्रीनऐवजी होममेड लोशन बनवा

बदाम आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका बाउलमध्ये बदाम आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. समान प्रमाणात खोबरेल तेल घ्या. या मिश्रणात कोमट पाणी, झिंक ऑक्साईड घाला. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि होममेड लोशन वापरून आपण बाहेर जाऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 4 natural oils are extremely beneficial for the skin)