Hair | घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

| Updated on: Apr 20, 2022 | 6:30 AM

उन्हाळ्यात जास्त घाम येण्यामुळे त्वचा (Skin) आणि केसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घामामुळे केवळ त्वचाच नाही तर केसही (Hair) निस्तेज होऊ शकतात. निर्जीव होण्याबरोबरच ते कोरडे होतात आणि हळूहळू केस गळणे देखील सुरू होते. तज्ज्ञांच्या मते टाळू आणि केसांमध्ये येणारा घाम, त्यांच्यातील घाण एकत्र येऊन अनेक समस्या (Problem) निर्माण होऊ लागतात.

Hair | घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यात जास्त घाम येण्यामुळे त्वचा (Skin) आणि केसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घामामुळे केवळ त्वचाच नाही तर केसही (Hair) निस्तेज होऊ शकतात. निर्जीव होण्याबरोबरच ते कोरडे होतात आणि हळूहळू केस गळणे देखील सुरू होते. तज्ज्ञांच्या मते टाळू आणि केसांमध्ये येणारा घाम, त्यांच्यातील घाण एकत्र येऊन अनेक समस्या (Problem) निर्माण होऊ लागतात. त्यामुळे टाळूमध्ये कोंडा आणि खाजही सुरू होते. कोरडे केस दुरुस्त करून त्यांना पुन्हा चमकदार बनवता येते. यासाठी आपण काही घरगुती टिप्स फाॅलो करणे अत्यंत महत्वाचे आहे.

तेल मालिश

केस कोरडे आणि निर्जीव होण्यामागे पोषणाचा अभाव हे देखील एक कारण असू शकते. पौष्टिकतेच्या अभावामुळे आणि घाम येणे, केस तुटणे सुरू होते. तेल केसांच्या मुळांमध्ये जाऊन ते दुरुस्त करते. तेल लावण्याचा फायदा असा आहे की केस पुन्हा चमकू लागतात. तेल लावताना एक ते दीड तास तेल केसांमध्ये ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा. केसांमध्ये कंडिशनर वापरण्यास विसरू नका.

टूल्स

काही वेळाने टाळूमधील घाम सुकायला लागल्यावर केसांना इजा होऊ लागते. यादरम्यान लोक उष्णतेची साधने वापरतात. या टूल्सच्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते केसांमध्ये उष्णतेच्या साधनांचा वापर अजिबात करू नये, केसांना कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी रात्रीचा दिनक्रम पाळा, मॉइश्चरायझरच्या माध्यमातून केसांमध्ये ओलावा निर्माण करू शकता.

काळजी घ्या

या हंगामामध्ये आपण घराबाहेर पडताना त्वचेची अधिक काळजी घेतो.मात्र केसांकडे दुर्लक्ष करतो. घामासोबत केसांवर पडणारा सूर्यप्रकाश त्यांना कमजोर करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशामुळे केसांमधील आर्द्रता दूर होते. केस कोरडे होऊ शकतात. अशा परिस्थितीत केस कोरडे होऊ लागतात. बाहेर जाण्यापूर्वी केस चांगले झाकून तुम्ही त्यांना या समस्येपासून वाचवू शकता.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

Onion health benefits | तुम्हीही या प्रकारचा कांदा खाणे टाळता? मग वाचा होणारे फायदे!