Skin Care : काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!

| Updated on: Mar 31, 2022 | 9:06 AM

उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटंले की, त्वचेच्या ढिगभर समस्या निर्माण होतात. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये टोमॅटोचा (Tomatoes) समावेश करू शकता. टोमॅटो हा असाच एक घटक आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात

Skin Care : काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटंले की, त्वचेच्या ढिगभर समस्या निर्माण होतात. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये टोमॅटोचा (Tomatoes) समावेश करू शकता. टोमॅटो हा असाच एक घटक आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय हे अनेक सौंदर्य फायद्यांसाठी देखील ओळखले जाते. टोमॅटो त्वचेची टॅनिंग (Tanning) दूर करण्याचे काम करतात. टोमॅटोमध्ये इतर अनेक नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात टोमॅटोचा फेसपॅक घरच्या-घरी कसा तयार करायचा.

टोमॅटो आणि मुलतानी माती फेसपॅक

ज्याप्रमाणे आपल्या त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर आहे, तसेच त्वचेसाठी मुलतानी माती देखील अत्यंत फायेदशीर आहे. मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी आपल्याला टोमॅटो प्युरी आणि मुलतानी माती चांगली मिसळावी लागले. 15 मिनिटे चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

टोमॅटो, चंदन आणि लिंबू

हा फेसपॅक तयार करण्यासाठी टोमॅटो प्युरी बनवा. त्यात एक चमचा चंदनाचा रस घाला. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. ते मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. चंदन आणि लिंबू देखील त्वचेवरील टॅन दूर करण्यास मदत करतात.

टोमॅटो, दूध आणि कोरफड

हा फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीत मॅश केलेले टोमॅटो दुधाची पावडर आणि 3 चमचे कोरफडीचा गर मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. हे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणि चमक आणण्यास मदत करेल.

टोमॅटो आणि दूध फेसपॅक

एका भांड्यात मॅश केलेले टोमॅटो आणि 2 चमचे दूध एकत्र करा. हा पॅक चेहऱ्यावर समान रीतीने लावा. 5 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनच्या समस्येसोबतच चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासही मदत होते.

टोमॅटो आणि हळद फेसपॅक

2 चमचे टोमॅटोचा रस आणि हळद पावडर मिसळा. ते नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 वेळा देखील वापरू शकता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

संबंधित बातम्या : 

Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!

Health Care : मधुमेह व पायाचे आजार आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून सविस्तरपणे!