Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा! 

आपली त्वचा तेजस्वी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील त्वचा सुंदर होण्यास मदत होते.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हे फेसपॅक वापरा! 
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 2:31 PM

मुंबई : आपली त्वचा तेजस्वी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील त्वचा सुंदर होण्यास मदत होते. आपला चेहरा स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. (Use this face pack to get glowing skin)

चंदन पावडर, मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात बेसन पीठ मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दोन तासानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीत केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा.

कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. मुलतानी माती, मध, गुलाब पाणी आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा मिक्स करून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतो.

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल, तर आपण मध वापरू शकता. मध आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी, तसेच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. कोरड्या त्वचेवर मध लावून आपण तिला मॉइश्चराइझ करू शकता. मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते. दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this face pack to get glowing skin)