AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा; अन्यथा होईल नुकसान

आपण कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी त्याची एक्सपायरी डेट सर्वात आधी पाहतो. ती व्यवस्थित असेल तरच आपण त्या गोष्टी घेतो. पण कधीही वस्तूवरील विशेषत: अन्नपदार्थांच्या पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर या 3 गोष्टी देखील नक्की तपासा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.

फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर 'या' 3 गोष्टी सर्वात आधी पाहा; अन्यथा होईल नुकसान
Before buying packaged food, check not only the expiry date but also the ingredients list, nutrition label, FSSAI numberImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 26, 2025 | 3:04 PM
Share

आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर एक्सपायरी डेट बरोबर असेल तर उत्पादन देखील ठीक असते, सुरक्षित असते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की वस्तूची तारीख बरोबर असते, परंतु त्याची गुणवत्ता खराब निघण्याची शक्यता असते. यामुळे केवळ पैशाचे नुकसान होत नाही तर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही केवळ तारीखच नाही तर इतर काही महत्त्वाच्या गोष्टी देखील काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे असते.

एक्सपायरी डेट व्यतिरिक्त या गोष्टी देखील नक्की पाहा

1. इंग्रीडिएंट्स लिस्ट

जेव्हा तुम्ही कोणतेही पॅकेज्ड अन्न खरेदी करता तेव्हा प्रथम त्याच्या घटकांची यादी तपासा, ही यादी बहुतेकदा पॅकेज्डच्या मागे किंवा त्याच्या एका साईडला छापलेली असते. त्यामध्ये त्या अन्नात काय काय इंग्रीडिएंट्स असतात ते सांगितले जाते. जर तुम्हाला यादीत ही नावे दिसली – -रिफाइंड शुगर, हाइड्रोजेनेटेड ऑयल, मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG), प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा आर्टिफिशियल फ्लेवर, तर अशा उत्पादनांपासून दूर रहा, या गोष्टी जास्त काळ खाल्ल्याने शरीराला, विशेषतः मुले आणि वृद्धांना हानी पोहोचू शकते. नेहमी अशी उत्पादने खरेदी करा ज्यात नैसर्गिक घटक असतील, जसं की होल ग्रेन, देशी तूप, मध किंवा तुम्ही ऐकलेला कोणताही मसाला.

2. न्यूट्रिशन लेबल वाचायला विसरू नका

बऱ्याचदा आपण या भागाकडे दुर्लक्ष करतो, पण हाच कॉलम सर्वात महत्वाची माहिती देतो. पॅकेटवर न्यूट्रिशन फैक्ट्सचा एक छोटासा बॉक्स निश्चितपणे दिलेला असतो. त्यावरून उत्पादनात किती कॅलरीज, फॅट, शुगर, फायबर, प्रोटीन आणि कार्ब्स आहेत हे समजते

जर तुम्हाला निरोगी अन्न खायचे असेल, तर असे उत्पादन निवडा ज्यामध्ये कमी शुगर, कमी ट्रान्स फॅट आणि जास्त फायबर आणि प्रोटीन असतील. न्यूट्रिशन लेबल तुम्हाला कोणते उत्पादन चांगले आहे हे ठरवण्यास मदत करते. जर तुम्ही दोन प्रोडक्ट्समध्ये गोंधळलेले असाल, तर या बॉक्सच्या मदतीने त्यांची तुलना करणे सोपे जाते तसेच आरोग्यासाठी चांगले असलेले प्रोडक्टस् खरेदी करू शकता.

3. FSSAI क्रमांक आणि मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स

प्रत्येक पॅकेज्डवर FSSAI क्रमांक लिहिलेला असतो, ज्यावरून हे समजते की प्रोडक्टला सरकारने मान्यता दिली आहे की नाही. जर एखाद्या प्रोडक्टच्या पॅकेजवर हा क्रमांक नसेल, तर ते खरेदी करणे धोकादायक असू शकते. तसेच, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स वाचा, म्हणजे ते कोणत्या कंपनीने बनवले आहे, ते कुठे बनवले आहे आणि केव्हा बनवले आहे. यामुळे तुम्हाला कळेल की उत्पादन किती नवीन आहे आणि कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवता येईल.

तसेच या गोष्टी लक्षात ठेवा: 1. जर पॅकेटचा सील तुटलेला असेल तर तो उत्पादन कधीही खरेदी करू नका. 2. जर पॅकेटमध्ये ओलावा दिसला किंवा त्यातून विचित्र वास येत असेल तर समजून घ्या की ते खराब झाले आहे. 3. आता अनेक उत्पादनांमध्ये एक QR कोड देखील असतो, त्याला स्कॅन करून तुम्ही त्याचा रिपोर्ट, रिव्यू किंवा ट्रॅकिंग करू शकता. 4. बनावट किंवा अज्ञात ब्रँडच्या वस्तू घेणं टाळा, विशेषतः जेव्हा अन्नपदार्थ किंवा कोणतीही खाण्याची गोष्ट खरेद करत असाल तेव्हा

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा