
अंघोळ केल्याने शरीराचा जवळपास निम्मा थकवा निघून जातो. आणि शरीर शांत, तणावमुक्त होतं. त्यामुळे सकाळी आळस जाऊन ताजेतवाने वाटावे म्हणून अंघोळ करतो. काहीजण रात्री झोपण्याआधी अंघोळ करतात जेणेकरून शरीराचा थकवा दूर होतो. रात्री आंघोळ करण्याच्या बऱ्याच फायद्यांबद्दलही आपण ऐकलं असेल. दिवसभराच्या धावपळीनंतर, धूळ आणि ताणतणावानंतर, रात्री आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतोच, शिवाय मन आणि त्वचेसाठीही वरदान ठरू शकते. तसेच त्यामुळे गाढ झोप लागते. त्वचा देखील चांगले होते. आणि मनही शांत होते.
रात्री आंघोळ केल्याने कोणते आजार होऊ शकतात?
पण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने काहींना त्रासही होऊ शकतो. रात्री अंघोळ केल्याने काहींना सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोमची लक्षणे वाढू शकतात. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.
रात्री आंघोळ करण्याचे फायदे
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे अनेक फायदे देखील आहे. झोप चांगली येते. जर तुम्हाला रात्री झोप लागण्यास त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शांत झोप येते. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान थोडे वाढते तसेच मेंदूला आराम जाणवतो. डोक्यात चाललेले विचार कमी होतात. ज्यामुळे शरीर झोपेसाठी तयार होते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ रात्री चांगल्या झोपेसाठी आंघोळ करण्याचा सल्ला देतात.
ताण आणि थकवा यापासून आराम
दिवसभराच्या व्यस्ततेनंतर, शरीर आणि मन दोन्ही थकून जातात. अशा परिस्थितीत, रात्री आंघोळ करणे हे डिटॉक्स थेरपीचे एक रूप आहे. पाण्यातील थंडपणा किंवा उबदारपणा स्नायूंना आराम मिळतो. रक्ताभिसरण सुधारतो आणि मानसिक ताण कमी होतो. बरेच लोक याला “डे-एंड क्लींज” असेही म्हणतात.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
रात्री आंघोळ करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचेची काळजी घेणे. दिवसभर प्रदूषण, धूळ आणि घामाने भिजलेली त्वचा झोपण्यापूर्वी स्वच्छ न केल्यास एलर्जी होऊ शकते. रात्री आंघोळ केल्याने नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ होते, दुर्गंध दूर होतो. तसेच केसांमधील घाण देखील काढून टाकते. म्हणून, रात्री आंघोळ करणे चांगले आहे पण तेवढी काळजी देखील घेतली घेतली पाहिजे. जेणेकरून त्रास होणार नाही.