Hotel : शॅम्पू, कंडिशनर, साबणच नाही तर, हॉटेलमधून ‘या’ वस्तू तुम्हाला फुकट घेऊन जाता येतील

Hotel : हॉटेलमध्ये अनेक अशा वस्तू असतात, ज्या आपल्याला आकर्षित करतात. त्या वस्तू घरी आणण्याची देखील इच्छा अनेकांनी असते. तर अशा वस्तूंपैकी शॅम्पू, कंडिशनर, साबणच नाही तर, अन्य काही वस्तू देखील तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता...

Hotel : शॅम्पू, कंडिशनर, साबणच नाही तर, हॉटेलमधून या वस्तू तुम्हाला फुकट घेऊन जाता येतील
Hotel
| Updated on: Nov 06, 2026 | 12:02 PM

Hotel : सध्या दिवाळी सुरु आहे आणि दिवाळी झाल्यानंतर अनेकांचा फिरण्याचा प्लान असतो. घरापासून कुठेही लांब फिरायचं झाल्यास आपण सर्वात आधी हॉटेल बुक करतो. कारण फिरायला गेल्यानंतर आराम करता येईल. हॉटेलच्या रुमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा काही आकर्षित करणाऱ्या वस्तू असतात, ज्या घरी घेऊन जाण्याची इच्छा अनेकांची असते. हॉटेलमधील हेअर ड्रायर, उशा, पडदे आणि दिवे दिसायला आकर्षक असतात. पण तुम्ही या सर्व वस्तू मोफत घरी नेऊ शकत नाही. या वस्तू नेताना पकडले गेल्यास, त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते आणि दंड देखील आकारला जातो. पण, वैयक्तिक किट, शॅम्पू, कंडिशनर, साबण, चहा आणि कॉफीचे साहित्य घरी नेण्यास परवानगी आहे.

काही लोकांना हॉटेलमध्ये आकर्षक दिसणारी प्रत्येक गोष्ट हवी असते आणि ते उघडपणे मागतात. इतकंच नाही, तर काही लोक कोणालाही न सांगता हॉटेलच्या खोलीतून वस्तू घेतात. पण तुम्ही अशा काही वस्तू आहेत, ज्या हॉटेलच्या खोलीतून सहजपणे घेऊन जाऊ शकता . तुम्ही वापरत असलेल्या काही वस्तू चेक-आउटनंतर फेकून दिल्या जातात. त्यामुळे तुम्ही या लहान वस्तू खोलीतच ठेवून किंवा तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता.

Loading...

हॉटेलमधून तुम्ही कोणत्या वस्तू मोफत घेऊन जाऊ शकता?

तुम्ही बाथरूममधील शॅम्पू, कंडिशनर, लोशन आणि साबण यांसारख्या वस्तू घेऊन जाऊ शकता.

वैयक्तिक वापरासाठी ठेवलेल्या वस्तू, जसे की टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर आणि कंगवा, काढून घेतल्यास कोणीही प्रश्न विचारणार नाही.

बहुतेक आलिशान हॉटेल्समध्ये वापरून फेकून देण्याच्या चपला असतात. तुम्ही वापरलेली चप्पल, तुम्ही चेक-आऊट केल्यानंतर फेकून दिली जाते. त्यामुळे, या चपला घरी घेऊन जाण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो.

यात हॉटेलच्या खोलीत ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे.

तुम्ही तुमच्यासोबत टी बॅग्ज, कॉफी आणि साखरेची पाकिटे, आणि हॉट चॉकलेटची पाकिटे घेऊ शकता. एवढंच नाही तर, तुम्ही हॉटेलचा लोगो असलेले नोटपॅड, पेन आणि पेन्सिल घेऊन जाऊ शकता.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us