AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

Antibiotics for Viral Infections: आजकाल लहानमुलांना बदलत्या ऋतूमध्ये संसर्गाच्या समस्या होऊ शकतात. परंतु संसर्गाचा आजार झाल्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना अँटिबायोटिक्स देतात. परंतु अँटिबायोटिक्सचे सेवन तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.का? सर्दी खोकला आणि फ्लू झाल्यावर तुमच्या मुलांना अँटिबायटिक्स द्यावे की नाही? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत.

लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Feb 25, 2025 | 11:37 PM
Share

आजकाल बदलत्या ऋतूमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. शरीराला पोषण न मिळाल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पोशक तत्वांचा समावेश करू शकता.

आजकाल मुलांना संसर्गाची लागण झाल्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या सारख्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, जर लहान मुलांना खोकला किंवा सर्दी झाली तर पालक त्यांना अँटीबायोटिक्स देतात. कारण काही डॉक्टर ही औषधे देखील लिहून देतात.

अनेकवेळा मुलांना अँटीबायोटिक्स दिल्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. पण मुलांना खोकला आणि सर्दी झाल्यावर अँटीबायोटिक्स द्याव्यात की नाही? हे मुलांना नुकसान करतात की आजार बरा करतात का? चला जाणून घेऊया तज्ञांचे यावर काय मत आहे.

जर तुमच्या मुलाला सर्दी किंवा फ्लू झाला असेल तर अँटीबायोटिक्स देण्याचा विशेष फायदा नाही. अँटीबायोटिक्सचे सेवन केल्यामुळे जीवाणू मारतात. पण सर्दी आणि फ्लू हे विषाणूंमुळे होतात, बॅक्टेरियामुळे नाही. अँटीबायोटिक्स विषाणूंवर काम करतात, बॅक्टेरियावर नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलाला सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत असताना अँटीबायोटिक्स दिले तर ते आजार बरे करणार नाही. यामुळे काही नुकसान देखील होऊ शकते.

तज्ञांच्या मते, अँटीबायोटिक्सचे काम बॅक्टेरियाची वाढ रोखणे आहे. जेव्हा अँटीबायोटिक्स मुलांना दिले जाते तेव्हा ते शरीरात प्रवेश करते आणि बॅक्टेरिया मारते, परंतु शरीरात असलेले सर्व बॅक्टेरिया वाईट नसतात. पचनसंस्थेमध्ये काही प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात ज्यांच्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि शरिरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या मुलाला अँटीबायोटिक्स दिले तर काही प्रकरणांमध्ये ते चांगले बॅक्टेरिया नष्ट करू शकते. या

मुळे शरीराला नुकसान होते आणि अनेक आजार होऊ शकतात. चांगल्या बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे, मुलाला पोटात संबंधित समस्या होतात आणि मळमळ आणि अतिसार यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकवेळा पालकांना हे माहित नसते की खोकला आणि सर्दी साठी अँटीबायोटिक्स देऊ नयेत. या कारणांमुळे, जेव्हा जेव्हा मुलाला संसर्गाचा समस्या येते तेव्हा ते त्याला अँटीबायोटिक्स देत राहतात. जर हे दीर्घकाळ चालू राहिले तर त्यामुळे प्रतिजैविक प्रतिकार होऊ शकतो. ज्यामुळे गरज पडल्यास औषधे काम करणे थांबवू शकतात. यामुळे बाळावर उपचार करणे कठीण होते.

सर्दी आणि खोकला झाल्यास काय करावे?

सर्दी झाल्यावर तुम्ही दुध हळदीचे सेवन करा. हळदच्या अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे खोकला आणि सर्दी यांसारख्या विषाणूजन्य संसर्गांवर उपचार होतो.संसर्ग झाल्यावर तुम्ही लवंग, काळी मिरी, दालचिनी, आले, मध इत्यादी मसाल्यांचा वापर करून बनवलेले कढा बनवू शकता. एक वर्षाच्या किंवा त्याहून मोठे मुलांना सर्दी झाले असेल तर सफरचंदाचा रस, दूध किंवा मध घालून कॅफिनेटेड चहा द्या. गरम पाण्याची वाफ इनहेल केल्याने घसा ओला होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

Follow Us
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू