स्मोकिंग करा किंवा नका करु, ‘COPD’ तुम्हाला सोडणार नाही!

मुंबई : क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (COPD) हा जगातला पाचवा सर्वात घातक आजार आहे. सामान्यपणे हा आजार धुम्रपान करणाऱ्या लोकांना होतो, पण आता हा आजार धुम्रपान न करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतो आहे. ज्या लोकांनी आयुष्यात कधीच धुम्रपान केला नाही, त्यांनाही या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या …

स्मोकिंग करा किंवा नका करु, ‘COPD’ तुम्हाला सोडणार नाही!

मुंबई : क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (COPD) हा जगातला पाचवा सर्वात घातक आजार आहे. सामान्यपणे हा आजार धुम्रपान करणाऱ्या लोकांना होतो, पण आता हा आजार धुम्रपान न करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतो आहे. ज्या लोकांनी आयुष्यात कधीच धुम्रपान केला नाही, त्यांनाही या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या अधिक आहे.

सीओपीडी हे फुफ्फुसाच्या आजारांच्या ग्रुपचे नाव आहे. सीओपीडी संबंधित सर्वात सामान्य रोग जुने ब्रॉन्कायटिस आणि ऍम्फिसीमा आहेत. कधी-कधी एकाच व्यक्तीला हे दोन्ही आजार होऊ शकतात.

एका रिपोर्टनुसार, विकसनशील देशात सीपीओडीने होणाऱ्या मृत्यूंमध्ये 50 टक्के मृत्यूचं कारण बायोमासचा धूर असल्याच समोर आलं आहे. ज्यामध्ये 75 टक्के महिलांचा समावेश आहे.

बायोमास इंधन जसे की, लाकूड, जनावरांचं शेण, पिकांचे अवशेष हे सर्व धुम्रपान करण्याइतकचं घातक आहे. यांसर्वांमुळे महिलांमध्ये सीओपीडीचे प्रमाण तीप्पटीने वाढले आहे. विशेषकरून ग्रामीण परिसरात याचं प्रमाण अधिक बघायला मिळत आहे.

याचं एक मोठं कारण वायुप्रदुषण आहे. सध्या आपल्या देशात वायुप्रदुषणाचा स्तर ज्याप्रकारे वाढत चालला आहे, ते खरंच चिंताजनक आहे. वायुप्रदुषणात जगातील सर्वात प्रदुषित 20 शहरांमध्ये 10 शहरं ही भारतातील आहेत.

सीओपीडी होण्याचे कारण

हा आजार पसरण्यामागे अॅग्रीकल्चरल पेस्टीसाईड्स आणि डास पळवण्यासाठी वापरण्यात येणारी मॉस्क्विटो कॉईल यांचं वाढतं प्रमाण कारणीभूत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका मॉस्क्विटो कॉईलमधून 100 सिगारेट एवढा धूर, तर 50 सिगारेट एवढा फॉरमलडिहाईड निघतो, जो आपल्यासाठी जीवघेणा ठरु शकतो.

सीओपीडीची लक्षणं

• वेगाने श्वास घेणे

• कफ आणि खोकला होणे

• खोकताना रक्त येणे

• सतत कोल्ड फ्लू राहणे

• छातीत इंफेक्शन होणे

• छातीत दाटल्यासारखे वाटणे

• अशक्तपणा जाणवणे

• वजन कमी होत जाणे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *