
जगात असे अनेक देश आहेत, जेथील काही गोष्टी माहिती झाल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. भारताला देखील इतिहास लाभलेला आहे आणि तोच इतिहास जाणून घेण्यासाठी आजही परदेशातून पर्यटक भारतात येत असतात. तर जगात असा देखील एक देश आहे, जेथे गेल्या 96 वर्षांपासून एकही मुल जन्माला आलेलं नाही… तर देशात महिलांची संख्या देखील लहान आहे… या देशाबद्दल जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल… आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, तो देश नक्की कोणता देश आहे…
सांगायचं झालं तर, पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी वेगळं आहे. काही ठिकाणे काही गोष्टींमुळे खास ठरतात तर काही ठिकाणे तेथील नागरिकांमुळे. तुम्हाला असे अनेक तथ्य सापडतील जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी सामान्य देशांपेक्षा वेगळी आहेत. असं म्हणतात की, काही देश शापित आहेत, तर काहींमध्ये प्राचीन रहस्ये दडलेली आहेत. आज, आम्ही तुम्हाला एका छोट्या देशाबद्दल सांगणार आहोत जो सध्या चर्चेत आहे.
सर्वात प्रमुख ख्रिश्चन धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकन सिटी जगभरात चर्चेत आहे. पोप फ्रान्सिस इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेल्या स्वतंत्र देश व्हॅटिकन सिटीमध्ये राहत होते. राजधानी रोमच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात लहान देशाची ओळख कशी झाली ते आज जाणून घेऊ. तुम्ही या देशाबद्दल ऐकले असेल, परंतु त्याबद्दल तुम्हाला कदाचित काही मनोरंजक तथ्ये माहित नसतील.
युरोपमधील व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश मानला जातो. ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे. 1871 पर्यंत इटली अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता. त्याचा बराचसा भाग पोपच्या ताब्यात होता. म्हणून, जेव्हा इटली एक एकीकृत देश बनला, तेव्हा पोपचे अधिकार कमी झाले.
व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या देखील फार कमी आहे. यामध्ये महिलांची लोकसंख्या तर फार कमी आहे. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 800 आहे आणि याठिकाणी फक्त 30 – 40 महिला राहतात… तर या देशात गेल्या 96 वर्षात एकही मुल जन्माला आलेलं नाही.
व्हॅटिकन सिटीमध्ये राहणारे बहुतेक लोक धार्मिक आहे आणि ते लग्न करत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, देशात पुजारी, बिशप, कार्डिनल आणि पोप आहेत. या देशात विवाह व्यवस्था नाही…