
एक काळ असा होता जेव्हा अनेक देशांना गुलामी अनुभवली आहे. गोर बेट हे पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमधील डाकारच्या किनाऱ्याजवळ आहे. हे ठिकाण खूप दिसायला प्रचंड सुंदर आणि नयनरम्या दिसतं, परंतु त्याचा इतिहास देखील तितकाच वेदनादायक आहे. ठिकाण सुंदर असलं तरी लोकं याठिकाणी फिरण्यासाठी नाही तर, महिला आणि गुलाम खरेदी करण्यासाठी यायचे. हे ठिकाणी गुलामांच्या व्यापारासाठी, म्हणजेच गुलाम बाजार भरवण्याच्या जागेसाठी आजही लक्षात ठेवलं जातं…
आफ्रिकेतील सेनेगलमधील डाकारच्या किनाऱ्याजवळ वर्षांपूर्वी एक गुलाम बाजार होता जिथे अरब देशांतील लोक गुलाम खरेदी करण्यासाठी यायचे. जे वृद्ध होते त्यांना कमी किमतीत खरेदी केलं जात असे. सर्वात जास्त बोली महिला आणि तरुणांवर लावली जात होती.
या गुलामगिरी व्यवस्थेत, सुमारे 1 ते 1.2 कोटी आफ्रिकन लोकांना जबरदस्तीने अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेत नेण्यात आले. हे 16 ते 19 व्या शतकादरम्यान घडलं. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. येथील कोणत्याही जुन्या इमारतीशी छेडछाड करण्यास मनाई आहे. आजही या इमारती तेथे आहेत. शिवाय येथील इतिहास देखील थक्क करणारा आहे.
या व्यापाराने आफ्रिकेला पुर्णपणे उद्ध्वस्त केलं. सरदारांनी गुलाम विकण्यास सुरुवात केली. गावांमधून तरुण पुरुष आणि महिला विकत घेतल्या गेल्या, ज्यामुळे लोकसंख्या कमी झाली आणि शेती आणि शिक्षण बंद झाले. अखेर परिसरात फक्त वृद्ध आणि आजारी लोकच राहिली.
महिला आणि तरुण पुरुष अधिक बलवान असल्याने ते अधिक महाग होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुलाम बनवलेल्या आफ्रिकन लोकांना साखळ्यांनी बांधून 300 मैल किनाऱ्यावर नेण्यात आलं. त्यापैकी काही वाटेतच मरण पावले. नंतर त्यांना मिडल पॅसेज नावाच्या 5 हजार मैलांच्या प्रवासासाठी जहाजाने अमेरिकेत नेण्यात आले.
1808 मध्ये अमेरिकेने गुलाम व्यापार बेकायदेशीर ठरवला. 1833 मध्ये ब्रिटनने आपल्या संपूर्ण साम्राज्यात गुलामगिरी रद्द केली. 1850 मध्ये ब्राझीलने गुलामांची आयात करणं बंद केलं, परंतु 1888 मध्ये गुलामगिरी पूर्णपणे रद्द करण्यात आली…