कंगाल झाल्यामुळे अभिनेत्याने बायकोला अबॉर्शनसाठी रुग्णालयात नेलं, त्यानंतर धावत आला आणि…
वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्या गरिबीचा सामना केला. अशात अभिनेत्याने बायकोला अबॉर्शनसाठी रुग्णालयात नेलं पण..., घडलेली घटना अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली आणि...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर अशी वेळ आली होती, जेव्हा अभिनेत्याने स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा अंत करण्याचा विचार केलेला. अभिनेत्याने एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला, वयाच्या 19 व्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या कठिण प्रसंगी अभिनेत्याला वडिलांची गरज होती, तेव्हाच वडिलांची साथ सुटली. त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर तो नैराश्यात गेला. एवढंच नाही तर, कंगाल झाल्यामुळे अभिनेत्याने बायकोला अबॉर्शनसाठी रुग्णालयात देखील नेलं होतं.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सुरु आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आहे.मुलाखतीत अभिनेता म्हणाला. माझ्या वडिलांचे दारूचं दुकान होतं. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी आम्हाला ते विकायला सांगितलं. पण आम्ही ते विकले नाही. आमच्या ओळखीच्यांपैकी एक जण अजूनही ते चालवत आहे.
अर्जुनने सांगितले की त्यावेळी तो आर्थिक संकटाचा सामना करत होता. अभिनेत्याला पहिला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आईला सोनं देखील विकावं लागलं… एवढंच नाही तर, अभिनेत्याचं लग्न देखील लवकर झालं. त्याने पत्नी नेहाला मूल होऊ नये म्हणून पटवून दिलं होतं. कारण त्यावेळी त्याच्या खात्यात फक्त 40-50 हजार रुपये होते.
View this post on Instagram
अभिनेता म्हणाला, ‘मी पत्नीला अबॉर्शन करण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेलेलो… रुग्णालयात बसून आम्ही डॉक्टर आम्हाला कधी बोलावतील याची प्रतिक्षा करत होतो. त्याच दरम्यान मला एक मेसेज येतो… तेथे नेटवर्कचा नसल्यामुळे मी बाहेर आलो… पाहिलं एका मुलाच्या वाढदिवसाचे आमंत्रण होते. तेव्हा माझ्या समोर साईबाबांचं एक मोठा फोटो होता. मला वाटलं की हे खूप सकारात्मक लक्षण आहे. ‘
‘मी रुग्णालयात पळत गेलो आणि पत्नीला सांगितलं मला बाळ हवं आहे… त्यानंतर आमचं बाळ आमच्या घरात आलं… त्यानंतर सर्वकाही बदललं… ती घटना माझ्या आयुष्यातील एका फिल्मी कथेसारखी होती…’ असं देखील अभिनेता म्हणाला. अर्जुन याने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो.
