99 टक्के लोक चहा बनवताना करतात चूक, ‘या’ 3 गोष्टींमुळे गंभीर आजाराचा धोका

99 टक्के लोक चहात 3 चुकीच्या गोष्टी घालतात, यामुळे चहाला तव येते मात्र शरीराची हानी होते. अशा चहाचे सेवन केल्याने अनेकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो.

99 टक्के लोक चहा बनवताना करतात चूक, या 3 गोष्टींमुळे गंभीर आजाराचा धोका
tea news
| Updated on: Jul 21, 2025 | 6:14 PM

भारतासह जगभरातील लोकांना चहा पिण्याचे वेड आहे. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने होते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. बऱ्याच लोकांना चहाचे व्यसन असते, त्यामुळे असे लोक भर उन्हातही चहा पितात. काही लोक वेळ घालवण्यासाठी चहा पितात.

समोर आलेल्या माहितीनुसार 99 टक्के लोक चहात 3 चुकीच्या गोष्टी घालतात, यामुळे चहाला तव येते मात्र शरीराची हानी होते. अशा चहाचे सेवन केल्याने अनेकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. आयुर्वेदानुसार या तीन गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास शरीराची हानी होती. त्यामुळे असा चहा पिणे टाळले पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे.

चहात या 3 गोष्टी घालू नका

चहामध्ये 3 गोष्टी टाकल्याने शरीराचे सर्वाधिक नुकसान होते. पहिले दोन पदार्थ म्हणजे दूध आणि साखर. काही लोक साखरेऐवजी चहात गूळ वापरतात, मात्र गुळामुळेही शरीराची मोठी हानी होते. दररोज चहा पिल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण आणि रक्तातील ग्लुकोज वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे चहामध्ये या गोष्टी टाकू नका.

चहासोबत या गोष्टी खाणे टाळा

रिकाम्या पोटी चहा पिणे शरीरासाठी घातक आहे. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. अनेकजण चहासोबत नमकीन, समोसे, भजी खातात, मात्र यामुळेही शरीराचे नुकसान होते. तुम्ही जर चहासोबत या पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. यामुळे भविष्यात तुम्हाला गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ चहासोबत खाणे टाळावे.

आरोग्यासाठी कोणता चहा चांगला?

चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र चहा योग्य पद्धतीने बनवलेला हवा. आरोग्यदायी चहासाठी चहा पावडरऐवजी तुम्ही आले, पुदीना या औषधी वनस्पती टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीराला फायदा होईल. तसेच अनेक गंभीर आजार दूर होतील. या औषधी वनस्पती रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि जळजळ कमी करतात. यामुळे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यासारख्या धोकादायक आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळे दुधाच्या चहाऐवजी औषधी वनस्पती असलेला चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.