मेकअप करताना या चुका टाळा, नाहीतर त्वचेचे होईल अपरिमित नुकसान

| Updated on: Feb 02, 2023 | 3:00 PM

मेकअप करताना त्वचेची तयारी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मेकअपच्या स्वच्छतेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

मेकअप करताना या चुका टाळा, नाहीतर त्वचेचे होईल अपरिमित नुकसान
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – पार्टीला जाणे असो किंवा डेटसाठी तयार होणे, मेकअप करणे (makeup) कधीही टाळता येत नाही. मेकअप तुम्हाला कायमस्वरूपी सुंदर बनवत नाही पण त्यामुळे  तुम्हाला आत्मविश्वास मिळतो व आकर्षक दिसण्यास मदत होते. मेकअप करण्याचा क्रम लक्षात ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मेकअपच्या स्वच्छतेची (cleanliness) काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण मेकअप करताना उत्पादनांचा थेट त्वचेच्या पेशींशी संपर्क येतो. अशा परिस्थितीत स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर त्वचेशी संबंधित (skin problems) अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही हायजिन टिप्सबद्दल जाणून घेऊया.

1) मेकअप ॲप्लिकेटर्स स्वच्छ ठेवा

जर तुम्ही मेकअप ॲप्लिकेटरची स्वच्छता न करता वारंवार वापरत असाल तर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांचा धोका असतो. मेकअप ॲप्लिकेटर साफ केल्याने केवळ बॅक्टेरिया आणि जंतूचा धोका कमी होत नाही तर मेकअपचे डाग, डेड स्किन सेल्स देखील टाळता येते. ज्यामुळे अनेक स्किन इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक वेळी मेकअप केल्यानंतर, तुमचे ॲप्लिकेटर नक्की स्वच्छ करा.

हे सुद्धा वाचा

2) प्रॉडक्ट्सच्या एक्सपायरी डेटची काळजी घ्या

अनेकदा आपण मेकअप प्रॉडक्ट्सच्या एक्सपायरी डेटकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मेकअप लावल्यानंतर खाज सुटणे, लालसरपणा किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणतेही प्रॉडक्च वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासून पहावी. विशेषत: डोळ्यांच्या मेकअपच्या वेळी, कारण बहुतेक डोळ्यांसाठी वापरली जणारी प्रॉडक्ट्सचा लाईफस्पॅन कमी असतो.

3) मेकअप ॲप्लिकेटर्स स्वच्छ करताना हातांचा वापर टाळा

मेकअप ॲप्लिकेटर्सची वेळोवेळी स्वच्छता करण्याबरोबरच त्यांची योग्य प्रकारे स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. अनेकदा लोक त्यांच्या हाताच्या मदतीने ॲप्लिकेटर साफ करतात. मात्र यामुळे हातातील जंतू ॲप्लिकेटरमध्येही येऊ शकतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे ॲप्लिकेटर नेहमी टिश्यू किंवा कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. मेकअप ॲप्लिकेटर खोलवर स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

4) सनस्क्रीनचा वापर टाळणे अयोग्य

तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. कारण सनस्क्रीन तुमचा मेकअप बेस स्थिर ठेवण्यास आणि उत्पादनांच्या रसायनांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. सनस्क्रीनचा जाड थर लावल्याने, उत्पादन त्वचेच्या पेशींच्या थेट संपर्कात येणार नाही. यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्यही चांगले राहील आणि तुम्हाला त्वचेच्या समस्यांचा धोका राहणार नाही.

5) मेकअप काढल्याशिवाय झोपू नका

मेकअप करून झोपणे म्हणजे त्वचेच्या समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. रात्रीच्या वेळी त्वचेला बरे होण्याची संधी मिळते. अशा वेळी मेकअप त्वचेच्या बरे होण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबवू शकतो. यासोबतच उत्पादनातील रसायनेही बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचे कारण बनतात. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरच्या मदतीने मेकअप काढून त्वचेला मॉयश्चरायझर लावल्यानंतरच झोपावे.