केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक उपाय एकदा नक्की करून पाहा !

| Updated on: May 23, 2021 | 4:04 PM

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केस गळतीची समस्या निर्माण होते.

केस गळती रोखण्यासाठी हे नैसर्गिक उपाय एकदा नक्की करून पाहा !
या घरगुती कंडीशनरमुळे आपले केस मुलायमदार आणि सुंदर दिसतील. (टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Follow us on

मुंबई : केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केस गळतीची समस्या निर्माण होते. केस गळती रोखण्यासाठी वेळेपूर्वी उपचार करणे फार महत्वाचे आहे. केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी आपण काही नैसर्गिक उपायही अवलंबु शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, केस गळती रोखण्यासाठी काही घरगुती उपाय (Do this natural remedy to prevent hair loss)

अॅपल व्हिनेगर – आपली टाळू स्वच्छ करण्यासाठी आणि केसांची पीएच पातळी संतुलन राखण्यासाठी अॅपल व्हिनेगर अत्यंत फायदेशीर आहे. हे केसांच्या वाढीस मदत करते. यासाठी, आपल्याला पाण्यात व्हिनेगर मिसळावे लागेल. केस धुतल्यानंतर हे तुम्ही केसांना लावा. हे आपली केस गळती रोखण्यासाठी मदत करते.

कांद्याचा रस – हा केसांवरील एक जुना उपाय आहे. कांद्यामध्ये सल्फर असते यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते. कांद्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्रित करून टाळूच्या त्वचेवर लावल्यास केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. यातील पोषक घटक केसांमधील कोंडा कमी करण्याचे कार्य करतात.

अंडी – अंड्यात लेसिथिन आणि प्रथिने असतात, ज्यामुळे केवळ केस मजबूतच होत नाहीत तर केसांना पोषणही मिळते. त्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते. यामुळे डोक्यातील कोंडाची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये दोन अंडी घाला आणि ते मिश्रण टाळूपासून ते केसांपर्यंत 30 मिनिटांनंतर केस धुवा.

नारळाचे दूध – नारळाचे दूध नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीसाठी सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक आहे. यासाठी आपण नारळाच्या दुधात काही थेंब लिंबाचा रस तसेच लैव्हेंडर तेल घालू शकता. 4-5 तास तसेच ठेवा, यानंतर केस धुवा. हे केस निरोगी आणि केस मजबूत ठेवण्यास मदत करेल.

कोरफड – कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

(Do this natural remedy to prevent )